डॉ.आंबेडकर यांना निवडणूकित पडण्याचे काम काँग्रेसने केले -अमित शहा

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान तयार करण्यात मोठं योगदान होतं. वेगवेगळ्या वादग्रस्त मुद्यांवर सर्वांना एकत्र आणण्याचं काम आंबेडकरांनी केलं. देशातील दलित, अदिवासींना न्याय देण्याचं काम त्यांनी केलं. सर्व समाजाला सोबत ठेवून देशाचा विकास करण्यासाठी संविधान तयार कऱण्यात आलं असं म्हणत आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान जगात सर्वश्रेष्ठ असल्याचं मत अमित शहांनी यावेळी व्यक्त केलं.

केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शहाहे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज पुण्यामध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं भुमिपूजन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. यावेळी अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसने नेहमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित करण्याची एकही संधी काँग्रेसनं सोडली नाही. त्यांना भारतरत्न देण्याचं काम बिगर काँग्रेसी सरकारने केलं. आंबेडकर यांच्याशी संबंधी पाच जागांना स्मृती स्थळ बनवण्याचं काम बिगर काँग्रेसी सरकारांनी केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हाही निवडणूक लढले तेव्हा त्यांना संसदेत येवू न देण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले

आणि आज तेच त्यांच्या नावाचा फायदा घेत असल्याचा आरोप अमित शहा यांनी केलाज्या काळात स्वराज्य हा शब्द बोलणं देखील कठीण होतं, त्याकाळात शळिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प केला आणि त्यांच्या या प्रयत्नांमुळे स्वराज्य निर्माण झालं असं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं. देशभक्तीसाठी युवकांना प्राणांचं बलिदान देण्यासाठी प्रेरीत केलं.

आपल्या अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून प्रशासनांचं एक चांगलं उदाहरण त्यांनी जगासमोर ठेवलं. सैन्याचं आधुनिकीकऱण करणे, सर्वात आधी नौदल बनवण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं त्यामुळे छत्रपती शिवजी महाराजांचा हा पुतळा सर्वांना प्रेरणा देणारा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Latest News