अटल महाशक्ती संपर्क अभियानाच्या मध्ये डॉ. भारती पवार यांचा सहभाग जहांगीर हॉस्पिटलला भेट


अटल महाशक्ती संपर्क अभियानाच्या मध्ये डॉ. भारती पवार यांचा सहभाग
जहांगीर हॉस्पिटलला दिली भेट
पुणे :
पुणे भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या अटल शक्ती महा संपर्क अभियानाच्या निमित्ताने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पुण्यात सहभाग घेतला. यावेळी जहांगीर हॉस्पिटलच्या डॉक्टर जहांगीर व प्रशासकीय,आरोग्य विभाग यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनांच्या पुस्तिका भेट दिल्या.
यावेळी डॉ. जहांगीर व अॅड. जहांगीर वकील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देश विकासाच्या गतिमान कार्यपद्धतीचे विशेष कौतुक करून येत्या काळात देश विकासाच्या कामांमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.त्यावेळी डॉ. भारती पवार यांनी त्यांचे भारतीय जनता पार्टीच्या कामकाजात मनःपूर्वक स्वागत केले.जहांगीर हॉस्पिटलला भेट , डॉ. जहांगीर, एड . जहांगीर वकील व सर्व टीमचे डॉक्टर भारती पवार यांच्यासमवेत भेट घडवण्यामध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक आघाडीचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते अली दारूवाला ,नगरसेवक उमेश गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.
या संपर्क अभियानाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या बरोबरीनेच पुण्यातील घराघरात पंतप्रधान मोदींच्या योजना पोहोचवण्याच्या या अभियानाचे यावेळी डॉ. पवार यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी उपस्थित जहांगीर हॉस्पिटलच्या टीमने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील लसीकरणाच्या मोहिमेचे विशेष उल्लेख करत संकटा काळात आरोग्यावर येणार्‍या आव्हानांना तोंड देण्यासाठी बळकट पायाभूत सुविधा या निमित्ताने उभ्या राहात आहेत या विषयी व मोदी सरकारच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले.
समाजातील विविध घटकांच्या प्रतिक्रिया सूचना व माहिती संबंधितांना नक्कीच उपयोगी पडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. अभियानाचे पुणे शहरातील प्रमुख संघटन सरचिटणीस राजेश पांडे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील, खासदार गिरीश बापट ,शहराध्यक्ष जगदीश मुळीक इत्यादींमुळे या महत्त्वपूर्ण अभियानात पुणे नक्कीच वेगळा ठसा उमटेल अशीही डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केली.
……

Latest News