क” क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्लोगेथोन मोहीम; ४ टन सुका कचऱ्याचे संकलन

पिंपरी- ऑनलाईन परिवर्तनाचा सामना २६ मार्च २०२२- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने सेक्टर 13 येथील मोकळ्या मैदान परिसरात आयोजित प्लोगेथोन मोहिमेत सुमारे 4 टन सुका कचरा गोळा केला. आज सकाळी जाधववाडी चिखली येथे राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी बी कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक शांताराम माने, आरोग्य निरीक्षक लक्ष्मण साळवे, वैभव कांचनगौडा यांच्यासह सुमारे 70 कर्मचारी सहभागी झाले होते.
आरोग्य सहाय्यक सागर सणस, आरोग्य मुकादम अभिमान बगाडे, संतोष जठार व सचिन घवाने, म. न.पा. व ठेकेदार कर्मचारी यांच्या सह सेक्टर १३ मधील आर. टी. ओ. मैदानामध्ये प्लॅगेथोन मोहीम आयोजित करण्यात आली. यामध्ये सुमारे 4 टन सुका कचरा (प्लास्टिक, कागद) उचलून घेण्यात आला.

नागरिकांनी आपल्या परिसरात स्वच्छता राखावी व कचरा महापालिकेच्या वाहनात विलगी करण करून द्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. रस्त्यावर अथवा खुल्या जागेवर कचरा टाकून परिसरात अस्वच्छता निर्माण करु नये असे आवाहन करण्यात येत आहे.

Latest News