स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी चित्रा वाघ यांनी घाणेरडं राजकारण करत एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं: महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर

मुंबई : . चित्रा वाघ यांनी कुचिक यांच्यावर कारवाईसाठी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप तरूणीनं केला आहे. त्यानंतर आता चित्रा वाघ मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. या प्रकरणावरून चाकणकर यांनी वाघ यांच्यावर जोरदार टीका केली आहे शेवटी दुध का दुध, पाणी का पाणी झालंच. स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी घाणेरडं राजकारण करत भाजपा महिला आघाडीचे अध्यक्ष चित्रा वाघ यांनी एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, अशी जहरी टीका महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली
पिडीत तरूणीनं फोन करून मला भेटण्याची ईच्छा व्यक्त केली आहे, असं चाकणकर म्हणाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुणे येथील रघुनाथ कुचिक प्रकरण प्रचंड गाजत आहे. अशातच आता या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. बलात्काराचे आरोप केलेल्या पिडीत तरूणीनं महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना फोन करत मोठा खुलासा केला आहे दरम्यान, रघुनाथ कुचिक हे शिवसेनेचे नेते आहेत. त्यांच्यावर आरोप करत वाघ यांनीच पहिल्यांदा हे प्रकरण बाहेर काढलं होतं. आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाल्यानं वाघ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.