राखी हे विश्वासाच प्रतिक, अँम्ब्युलन्स चालक बंधू ना राखी बांधून साजरी,राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस


संबंध महाराष्ट्रात उत्साहात साजरा होणारा श्रावण महिन्यातील पवित्र असा सण म्हणजे भावा बहिनीचे अतूट नातं असलेला रक्षाबंधन.
राखी हे विश्वासाच प्रतिक आहे , हाच विश्वास मनात ठेवून राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात ज्या कोरोणा योध्यांनी व बारा महिने जे स्वताच्या जीवाची पर्वा न करता खरंतर कठिन काळातही दिवसरात्र प्रमाणिकरित्या अविरतपणे जे कार्य करत असतात असे सर्वांचे बंधू अँम्ब्युलन्स चालक त्यांच्यासाठी हा आजचा सन त्यांच्या सोबत साजरा करून त्यांचे देखिल समाजात एक महत्वाचे स्थान आहे, हे मह्त्त्व पटवून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न युवतींनी केला व आजचा रक्षाबंधन हा सण अनोख्या पद्धतीने वाय. सी. एम हॉस्पिटल या ठिकानी युवती अध्यक्षा वर्षा जगताप यांच्या संकल्पनेतून साजरा केला
. यात सुहास पलांडे, नवनाथ वाडेकर, विजय शेलके, रामचंद्र जगताप, गणेश कामते, सचिन सुतार, नंदकुमार शिखरे, नरेंद्र पाटिल, राहुल माटेकर इ.चालकांना राखी बांधून शलाका बनकर, मेहेक इनामदार,शुभदा पवार, भव्यशीला गायकवाड़,मेघना जगताप,वैभवी गावड़े, वैष्णवी जगताप,इ. युवतींनी सहभाग घेतला व आजचा कार्यक्रम पार पडला. खरचं ह्या धकाधकीच्या काळात मनाला समाधान मिळणे अशक्य पण आज ते मिळाले. *रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा**#