एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांचे नैसर्गिक नाते: खा इम्तियाज जलील

ऑनलाईन परिवतर्नाचा सामना-

लोकसभा निवडणुकीतनंतर प्रकाश आंबेडककरांनी ती तोडली. शिवसेनेसोबत जाण्याचा त्यांचा निर्णय हा स्वतंत्र पक्ष म्हणून अधिकार आहे. पण ही युती म्हणजे राजकीय तडजोड असेल, विचारांवर आधारित ती नसले. केवळ मतपेटीचे राजकारण म्हणून या युतीकडे पाहिले जाईल. माझी अजून देखील इच्छा आहे,

एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांचे जे नैसर्गिक नाते आहे, ते पुढे सुरू राहावे. पण अर्थात हे सगळं प्रकाश आंबेडकरांवर अवलंबून आहे. आम्ही आजही वंचितसोबत जाण्यास तयार आहोत, असे देखील इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ऐतिहासिक विजय मिळवत देशातील धक्कादायक निकाल म्हणून नोंद केली होती. परंतु सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाला आणि या युतीमध्ये मीठाचा खडा पडला. परिणामी विधासभेला या दोन्ही पक्षांनी एकमेकांशी फारकत घेत स्वतंत्र निवडणुका लढवल्या होत्या. याचा राजकीय फायदा भाजपलाच झाला

.सध्या राज्यातील राजकारण हे नाट्यमय घडामोडीतून जात आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि सत्ता भोगलेल्या महाविकास आघाडीतील शिवसेना हा पक्ष सध्या अडचणीत सापडला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करून मोठ्या प्रमाणात पक्ष फोडल्यामुळे शिवसेना नव्या मित्राच्या शोधात आहे.

संभाजी ब्रिगेडशी शिवसेनेने युती केली असली तरी ब्रिगेडची राज्यातील ताकद मर्यादित आहे.शिवसेनेसोबत वंचितची युती म्हणजे राजकीय तडजोड आहे, एमआयएमसोबतची युती ही नैसर्गीक होती. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांची इच्छा आणि तयारी असले तर आम्ही युतीसाठी तयार आहोत, अशी भूमिका इम्तियाज जलील यांनी मांडली.

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या युतीने धुमाकूळ घातला होता.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेशी युतीसाठी पुढे केलेला हात उद्धव ठाकरे स्वीकारणार का? याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे. हे दोन पक्ष एकत्रित आले तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वेगळे चित्र पहायला मिळेल असा दावा केला जात आहे.

परंतु शिवसेना महाविकास आघाडीत असल्यामुळे काॅंग्रेस-राष्ट्रवादीला दुखावून ते प्रकाश आंबेडकरांसोबत जातील का? हा खरा प्रश्न आहेया नवीन समीकरणा संदर्भात एमआयएम-वंचित आघाडीचे खासदार इम्तियाज जलील यांना विचारले असता ते म्हणाले, २०१९ मध्ये एमआयएम-वंचित बहुनज आघाडीची झालेली युती ही राष्ट्रीय पातळीवरची युती होती. या नव्या युतीमुळे समाजातील वंचित, पिडित आणि कायम सत्तेपासून दूर राहिलेल्या लोकांना सत्तेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न झाला होता. वंचितसोबतची आमची युती ही नैसर्गीक युती होती.

Latest News