आता बहिणीच्या नावावर प्रॉपर्टी असेल तर, स्टॅम्प ड्युटी आकारली जाणार नाही, याचा आम्ही विचार करतोय…

ps logo rgb

मुंबई :(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)

उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष संधी साधू आहे. उद्धव ठाकरेंनी आधी आमच्या मेहरबानीवर सत्ता मिळवली त्यानंतर काँग्रेसच्या मेहरबानीवर मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे संधीसाधू राजकारणातील विशेषज्ञ आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. क्रिकेटपटू सरफराज खान यांच्याबाबत काँग्रेस प्रवक्त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर भाष्य करू शकत नाही. क्रिकेट बोर्डावरील खेळाडू आहेत तेच खेळाडूंची निवड करतात, असे शेलार यांनी सांगितले.ठाकरे बंधूचे एकत्र येणे हा कौटुंबिक विषय आहे. दोन बंधू एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे, असे सांगत त्यांनी मनसे-शिवसेना ठाकरे गटाच्या संभाव्य युतीवर आपली भूमिका शेलार यांनी स्पष्ट केली. ‘आगे आगे देखो होता है क्या’. त्यांना आधी भूमिका तर घेऊ द्या मग आम्ही बाण सोडू, असा इशाराही त्यांनी दिला.देशासह राज्यातील जनतेने काँग्रेस पक्षाची हकालपट्टी केली आहे. अशा पक्षाच्या प्रश्नावर आम्ही काय उत्तर द्यायचे. भाई जगताप तुमच्याकडे आधी बळ आहे का, नंतर वेगळं लढायचं बोला. महापालिका निवडणुकीबाबत आमचे वरिष्ठ नेते बोलतील आणि निर्णय घेतील, असेही शेलार म्हणाले. 

गेली १७ वर्ष सतत आरोग्य सेविका, आशावर्कर यांच्यासोबत भाऊबीज साजरी करतोय. आपण या विभागात खूप योजना आणल्या आहेत. याचा लाभ साडेबारा हजार पात्र बहिणींना लाभ मिळाला आहे. आता बहिणीच्या नावावर एखादी प्रॉपर्टी असेल तर त्याला आता स्टॅम्प ड्युटी आकारली जाणार नाही, याचा आम्ही विचार करतोय, अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी आज (दि. २३) दिली. वांद्रे परिसरात पालकमंत्री आशिष शेलार यांनी अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका आणि आशा वर्कर यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली. यावेळी ते म्हणाले, महायुती सरकारने लाडकी बहीण योजना राबवली. मात्र मागील १७ वर्षांपासून तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी आहात. आरोग्य सेविका, आशावर्कर यांनी कोरोना काळात घरोघरी जाऊन गर्भवती बहिणीची आणि नवजात बालकांची जबाबदारी घेतली. स्वतःचा जीव हातात घेऊन या काळात तुम्ही जबाबदारी पार पाडली. प्राथमिक स्तरावर मूलभूत सुविधांवर काम त्या करतात. मानधन किती त्यापेक्षा भावना महत्त्वाच्या आहेत, असेही शेलार यांनी यावेळी सांगितले.आपण या विभागात खूप योजना आणल्या की, जवळपास साडे १२ हजार पात्र बहिणींना त्याचा लाभ मिळाला आहे. बहिणीच्या नावावर एखादी प्रॉपर्टी असेल तर त्याला आता स्टॅम्प ड्युटी लागणार नाही याचा आम्ही विचार करतोय. एकीकडे जगभरात काही देश कर आकारणीमध्ये वाढ करत आहेत त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वस्तू व सेवा कर (GST) शून्य आणि ५ टक्क्यांवर आणला आहे, असेही मंत्री आशिष शेलार म्हणाले.शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे राजकीय ज्ञान किती उरलेय?, असा सवाल करत महायुती सरकारच्या विकास कामांमुळे संजय राऊत आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते ज्यांच्यासोबत बसलेत ते खंजीर खूपसत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

Latest News