ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट न केल्यास आम्ही एकटे राहू; प्रकाश आंबेडकर

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –शिवशक्ती-भीमशक्तीला (Congress) काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) विरोध कायम असल्याचे दिसत असून, आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीबाबत ठरवायचे आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. श्री. ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट न केल्यास आम्ही एकटे राहू; पण भाजपसोबत जाणार नसल्याचे सांगितले

अॅड. आंबेडकर म्हणाले, की शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी जे वक्तव्य केले, ते करायला नको होते. त्यामुळे लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. राज्यात सुरू असलेल्या सीमावाद प्रकरणात राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोषी आहेत

. शिवसेनेने राजकीय समझोता आणि आंदोलने या दोन गोष्टी वेगळ्या ठेवल्या, तर त्यांच्यावर शिंतोडे कमी उडतील. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिंतोडे स्वतःवर ओढवून का घेत आहे?, असा प्रश्न त्यांनी केला.ते पुढे म्हणाले, महागाई, बेरोजगारी, महापुरुषांवरील वक्तव्याच्या निषेधार्थ हा मोर्चा होता. यात, सीमावादाचा विषय नव्हता. मात्र अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सीमावादच मोठा विषय असल्याचे सांगितले.

त्यामुळे महाविकास आघाडीत आता कुरघोडी सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वंचितांना सत्तेत येऊ द्यायचे नाही. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी घेण्यासंदर्भात मतभेद आहेत. त्यामुळे आम्ही मोर्चात सहभागी झालो नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.धम्म मेळाव्यानिमित्त नाशिकमध्ये अॅड. आंबेडकर आले होते.

त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की अनेक दिवसांपासून हा मुद्दा चर्चेत आहे. याबाबत ठाकरेंच्या भेटीनंतर महाविकास आघाडीची बैठक झालीते म्हणाले, आधी उद्धव ठाकरे यांनी कॉल करून वंचितचा मुद्दा निकाली काढतो, असे सांगितले. मात्र बैठकीत हा मुद्दा चर्चेला गेला की नाही माहीत नाही.

परंतु अजित पवारांनी तो विषय चर्चाधीन आहे, असे प्रेसमध्ये सांगितले, याचा अर्थ त्यांचा विरोध कायम आहे. त्यामुळे आता शिवसेनेने निर्णय घ्यायचा आहे. आम्हाला घेऊन महाविकास आघाडीत जायचे आहे का, हे शिवसेनेने ठरवायचे आहे. त्यांना आम्हाला सोबत घ्यायचे की महाविकास सोबत जायचे, असा प्रश्‍नही आंबेडकरांनी उपस्थित केला

.

Latest News