लॅंडस्केप, स्केचिंग कार्यशाळेला चांगला प्रतिसाद-‘भारतीय विद्या भवन’,‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन


लॅंडस्केप, स्केचिंग कार्यशाळेला चांगला प्रतिसाद*——————————–‘भारतीय विद्या भवन’,‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन
पुणे ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘ लॅंडस्केप, स्केचिंग ‘ कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘ चित्रकार दिलीपकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले.
रविवार,दि.१८ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता मुक्तांगण वेधशाळा ,(सेनापती बापट रस्ता) येथे ही कार्यशाळा झाली.ही कार्यशाळा विनामूल्य होती.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर झालेला हा १४८ वा कार्यक्रम होता.
भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले. मुकुंद लेले आणि मान्यवर उपस्थित होते.दिलीपकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना इझल, पेन्सील, चारकोल, ब्रश , रंग या साधनांची प्राथमिक माहिती दिली.
आय लेव्हल, त्रिमिती, पर्स्पेक्टिव्ह, अशा संकल्पना सांगीतल्या.स्केच, लॅंडस्केपची प्रात्यक्षिके दाखवली. छायाचित्रणकला आणि चित्रकलेतील फरक समजावून सांगीतला. प्रत्यक्ष चित्रापेक्षा चित्रकाराला वेगळे काही दिसत असते, ते कागदावर उतरले पाहिजे. सतत सराव करत राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.सुलोचना नातू विद्यामंदिर, परांजपे विद्यामंदिर मधील ४० विद्यार्थी -विद्यार्थिनी सहभागी झाले