सामाजिक कार्यासाठी नूतन गुळगुळे यांचा ‘अवर नॉर्थ ईस्ट (O.N.E.)वन इंडिया अवॉर्ड – २०२२’ ने गौरव


*सामाजिक कार्यासाठी नूतन गुळगुळे यांचा ‘अवर नॉर्थ ईस्ट (O.N.E.)वन इंडिया अवॉर्ड – २०२२’ ने गौरव
स्वतःच्या जन्मजात दिव्यांग मुलासोबतच समाजातील अनेक दिव्यांगग्रस्त आणि विकलांग मुलांना समाज प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. अश्या कर्तुत्ववान महिला आपल्या भूमीत जन्माला येतात, हे महाराष्ट्राचे भाग्यच म्हणावे” असे गौरौद्गार माय होम इंडियाचे संस्थापक आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी या प्रसंगी बोलताना काढले

‘नूतन गुळगुळे फाउंडेशन’ची महाराष्ट्रात बहुविकलांग व्यक्तींसाठी काम करणारी एक प्रख्यात सेवाभावी संस्था अशी ओळख निर्माण झाली असून गेली सात वर्ष ‘ध्येयपूर्ती पुरस्काराने देशातील अनेक बहुविकलांग बहुगुणी व्यक्तींचा सन्मान नामांकित मान्यवरांच्या हस्ते करण्याचे काम त्यांच्या संस्थेद्वारे केले जात आहे.
कोरोनामुळे पालक गमावलेल्या ‘दिव्यांग’ बालकांकरिता विरार, अर्नाळा येथे वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्राची निर्मिती ‘नूतन गुळगुळे फाऊंडेशनद्वारे करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत काम करणाऱ्या ‘दिव्यांग कल्याण आयुक्तालया’ने या उपक्रमास मान्यता आहे.
‘करोना–१९’मुळे पालकत्व गमावलेल्या ग्रामीण महाराष्ट्रातील ‘दिव्यांग’ बालकासह त्याच्या एकल पालकाच्या’ निवासाची व्यवस्था, मार्गदर्शन, आरोग्य सेवा, शिक्षण इत्यादी देणारे भारतातील हे पहिले वसतिगृह असून येथे ४० दिव्यांग मुलांच्या निवासाची व्यवस्था असणार आहे.