बोपदेव घाटात डोक्यात दगड घालुन खुन करुन कोणालाही माहित नसलेला खुनाचा गुन्हा उघड, खुन करणा-या इसमास गुन्हे शाखेकडून अटक


आठ दिवसा पुर्वी बोपदेव घाटात डोक्यात दगड घालुन खुन करुन कोणालाही माहित नसलेला खुनाचा गुन्हा उघड करून खुन करणा-या इसमास गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली
आज रोजी पहाटे पोलीस अमलदारास अजय थोरात यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, इसम नामे किरण थोरात रा. राजीव गांधीनगर बिबवेवाडी पुणे याने नेहमी त्याचे बरोबर फिरणारा मित्रास बोपदेव घाटात मारुन टाकले आहे
माझा नातेवाईक मयत नामे धनंजय हरिदास गायकवाड रा. भुत बंगल्याजवळ सुखसागर नगर अपर इंदीरानगर पुणे आमच्यामध्ये पैश्याचा कारणावरुन मांडणे झाली होती त्यामध्ये त्याने मला जिवे ठार मारण्याची धमकी देत होता.दिनांक १२/१२/२०२२ रोजी साय ०५.३० वा सुमारारा धनजय गायकवाड हा दारु पिवुन माझे घरी आला व माझे आईला मला शिवीगाळ करून मारून टाकण्याची धमकी दिली.
त्याने माझे घरावर दगड फेक केली म्हणुन मी त्यास गोड बोलून झाले गेले विसरून जा, मी तुला पैसे देतो, दारु पाजतो असे म्हणुन त्याने आणलेल्या दुचाकी वरुन त्याचेसोबत जावुन दारु खरेदी करुन बोपदेव घाट शेवटचा टोकला जावुन त्यास दारु पाजली असता तो दारुच्या नशेत मला व माझ्या ३ महिन्याच्या मुलीला जिवंत जाळुन टाकेन अशी धमकी देवु लागला
सदरची कामगिरी मा. श्री रितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री संदिप कर्णिक – राह पोलीस आयुक्त, पुणे शहर मा श्री रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त गुन्हे मा श्री अमोल झेंडे पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, मा. श्री गजानन टोम्पे सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहा पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उप-निरीक्षक सुनिल कुलकर्णी, अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, राहुल मखरे, बिडल सांजुखे, निलेश साबळे यांनी केली आहे..