लावणीसम्राज्ञी दीप्ती आहेरने घेतला रसिकांच्या मनाचा ठाव ‘लाखात देखणी’ने पवनाथडीचा समारोप


लावणीसम्राज्ञी दीप्ती आहेरने घेतला रसिकांच्या मनाचा ठाव ‘लाखात देखणी’ने पवनाथडीचा समारोप
पिंपरी, प्रतिनिधी :यंदाची पवनाथडी उत्साहात पार पडली. पवनाथडीचा समारोप ‘लाखात देखणी’ फेम लावणीसम्राज्ञी दीप्ती आहेर यांच्या लावण्यांच्या कार्यक्रमाने झाला. याला सांगवीकरांनी एकच गर्दी केली होती. टाळ्या, शिट्ट्यांची उत्स्फूर्त दाद देत रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
16 ते 20 डिसेंबर दरम्यान सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. दोन वर्षानंतर भरलेल्या या जत्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सुटसुटीतपणा व स्वच्छता हे या जत्रेचे वैशिष्ट्य ठरले. वाघ्या मुरुळी, संबळ, भविष्य बघणारे आदी गोष्टींचाही नागरिकांनी आनंद लुटला. बच्चे कंपनीसाठी बालजत्रा आकर्षित करून गेली.
या जत्रेचा समारोप सांस्कृतिक कार्यक्रमाने झाला. गणेश स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. लावणीसम्राज्ञी दीप्ती आहेर यांनी आपल्या अदाकारीने तरुण, महिला, वृद्धांसह बच्चे कंपनीला खिळवून ठेवले. रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी लावणीसम्राज्ञी दीप्ती आहेरची वेगळीच छटा पाहायला मिळाली