राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल या पदावरून हाकलपट्टी करा: दलित पँथर च्या वतीने आमरण उपोषण
पुणे (ऑनलाइन परिवर्तनाचा सामना ) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढल्याबद्दल दलित पॅंथर च्या वतीन त्याची हकलपट्टी करण्यात यावी या मागनी साठी रोजीपासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आमरण उपोषणास करण्यात आले
सद्य परिस्थितीमध्ये राजकीय नेत्यांकडून थोर पुरूषांचे जाणीवपूर्वक अवमान केले जात आहेत. तसेच त्यांची जाणीवपूर्वक त्याची कोणा बरोबर ही तुलना करून त्यांच्या कार्याची अवहेलना केली जात आहे. त्याबाबत काही निषेध नोंदवणाऱ्यांवर बेकायदेशीर पोलीस कार्यवाही केली जात आहे. पोलीस यंत्रणाचा देखील दुरूपयोग केला जात आहे आणि हे सर्व सामान्य जनतेच्या निदर्शनास येत आहे.
ही परिस्थिती कायम राहिल्यास लोकशाही धोक्यात येण्यास अजिबात विलंब लागणार नाही. अगदी राज्यपालासारख्या संविधानिक पदावर असलेल्या जबबदार व्यक्तीकडून देखील थोर महापुरूषांची अवहेलना वारंवार होत आहे. त्याबाबत सरकारची कोणतीही कारवाई करण्याची इच्छा होत नाही. अप्रत्यक्षरित्या त्यांचे समर्थनच केले जात आहे. त्याची हाकल पट्टी करण्यात करावी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढल्याबद्दल दलित पॅंथर तर्फे दि. १७-१२-२०२२ रोजीपासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आमरण उपोषणास निखील पबसेटवार, विशाल शिंदे, पंकज पवार हे आमरण उपोषणास बसलेले असून, त्याच्या समर्थनास शेकडो संघटना राजकीय पक्षांचा जाहीर पाठींबा आहे.
राज्यपाल हे महाराष्ट्रातील जनतेची जोपर्यंत माफी मागत नाहीत आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना जोपर्यंत पदावरून हटवत नाही तो पर्यंत आमरण उपोषण करणार आहे. राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे तमाम महाराष्ट्रातील सामान्य जनता, शिवप्रेमी, दलित पिडीत-शोषित लोकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. .
……….राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल या पदावरून हाकलपट्टी करण्यात यावी पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यानी पैठण येथील कार्यक्रमात बोलताना शाळांना देण्यात येणाऱ्या अनुदानावरून दाखला देत असताना महापुरुषांबद्दल , “कर्मवीर भाऊसाहेब पाटील यांनी शाळा सुरु केल्या, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा सुरु करताना सरकारने अनुदान दिले नाही तर त्यांनी भिक मागितली” असे बेताब व वादग्रस्त वक्तव्य केल्यावरून आणि महापुरुषांना भिकारी संबोधल्यामुळे त्यांच्यावर तत्काल गुन्हा दाखल करावा. अशी मागनी आज दलित पैंथर पुणे शहर माथाडी अध्यक्ष शबाना मुलाणी पुणे शहर अध्यक्ष आकाश भाऊ पायाळ यानी भारती विद्यापीठ पोलिसा कड़े केली आहे हे आंदोलन दलित पँथर चे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नाडगम यांचा नेतृत्वखाली करण्यात आले