पुण्यातील कसबा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन…

पुणे: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

पुण्यातील कसबा मतदार संघाच्या भाजपच्या (BJP) आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले आहे. त्या अनेक दिवसांपासून दुर्धर आजाराने ग्रस्त होत्या. गॅलक्सी रुग्णालयात त्यांनी ३. ३० च्या दरम्यान, अखेरचा श्वास घेतलामुक्ता टिळक यांना भाजपकडून पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून 2002, 2027, 2012 आणि 2017 मध्ये निवडणून गेल्या होत्या.

कसबा मतदार संघात त्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या होत्या. त्या आधी पुण्याच्या अडीच वर्ष महापौर होत्या. त्यांनी राजकीय प्रवासाची सुरुवात नगरसेवक या पदावरुन केली. त्या चार वेळा पुणे महापालिकेत भाजपच्या नगरसेवक होत्या.

गेल्या काही काळापासून त्या कर्करोगाशी लढा देत होत्या. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते भारतीय जनता पक्ष शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा, स्थायनी समितीच्या सदस्या, तसेच पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा म्हणुनही त्यांनी काम केले होते.

त्याच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याचे वय ५८ वर्ष होते.भाजप संघटनेमध्ये त्यांनी विविध पदे भुषवली होती. दरम्यानच्या काळात झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी ऍम्ब्युलन्समध्ये जाऊन मतदान केले होते. त्यावेळी त्यांच्या पक्षनिष्ठेची मोठी चर्चा झाली होती.

Latest News