COVED: पुणे विमानतळावर आजपासून थर्मल स्क्रिनिंगला सुरुवात..

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी कोरोना परिस्थितीवर महत्वपूर्ण भाष्य केले. बिनवडे म्हणाले, कोरोना संकटाला सामोरे जाण्यासाठी पुणे महानगरपालिका सुसज्ज आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरु जाऊ नये. तसेच औषधांचा साठाही पुरेसा आहे. सावर्जनिक ठिकाणी मास्क वापरला तर सगळ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी फायद्याचे राहील.पुणे विमानतळावर देखील एक पथक तैनात करण्यात येणार आहे. तसेच आयसोलेशनची गरज पडली तर ती पण करण्यात येईल कोरोनाने पुन्हा एकदा जगभरात कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. चीनमध्ये तर कोरोनाच्या पहिल्या लाटेसारखी स्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोना ने जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनाने देखील कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच धर्तीवर पुणे विमानतळावर आजपासून (दि.22) थर्मल स्क्रिनिंगला सुरुवात केली जाणार आहेपुण्यात चिंतेचे कारण नाही. पण खबरदारी घ्यावी. सर्दी, खोकला, ताप असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावे. लसीकरणमध्ये पुणे शहर अग्रेसर आहेत. शहरात ९९ टक्के लसीकरण झाले आहे. बूस्टर डोसबद्दल देखील आपल्याकडे भरपूर साठा आहे. भवानी पेठ असो किंवा हॉटस्पॉट असतील ते आयडेंटीटीफाय करतो आहे. तिथे देखील आरोग्य विभाग काळजी घेणार आहे अशी माहिती बिनवडे यांनी दिली आहे.