बनावट जात प्रमाणपत्र: खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ…

मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत. बनावट जात प्रमाणपत्रा प्रकरणी शिवडी न्यायालयाने पोलिसांना अजामीनपात्र वॉरंटवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच २७ डिसेंबरपर्यंत पुढील सुनावणीदेखील तहकूब करण्यात आली आहे.

नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांनी बनावट जातप्रमाणपत्र मिळवल्याचे ठोस पुरावे आहेत, असे निरीक्षण विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी नोंदवले. तसेच, साक्षीदारांच्या जबाब आणि कागदपत्रांनुसार राणा आणि त्यांच्या वडिलांनी गुन्हा केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत आहे, असही न्यायालयाने सांगितले

.नवनीत राणा ज्या जागेवरून निवडून आल्या ती जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित होती. परंतु राणा यांनी त्या अनुसूचित जातीतील असल्याचा दावा करत निवडणूक लढवली. शाळा सोडल्याच्या खोट्या दाखल्याच्या आधारे त्यांनी जात प्रमाणपत्र मिळवून फसवणूक केली

. हे आधारे मुलुंड पोलीस ठाण्यात राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांनी विशेष न्यायालयाने बनावट जात प्रमाणपत्र मिळवल्याच्या आरोपातून दोषमुक्त करण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने ती फेटाळली. न्यायालयाने मागणी फेटाळल्यानंतर त्याविरोधात राणा आणि त्यांच्या वडिलांनी पुन्हा विशेष न्यायालयात धाव घेतली होती.

मुलुंड महानगरदंडाधिकाऱ्याने बजावलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंटला स्थगिती देण्याची मागणी राणा आणि त्यांच्या वडिलांनी विशेष न्यायालयाकडे केली होती. पण विशेष न्यायालयाने ती मागणी फेटाळून लावली दिल्यानंतर आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत.

बनावट जात प्रमाणपत्रा प्रकरणी शिवडी न्यायालयाने पोलिसांना अजामीनपात्र वॉरंटवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच २७ डिसेंबरपर्यंत पुढील सुनावणीदेखील तहकूब करण्यात आली आहे.

Latest News