सारस पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विनायक साखरे आणि उपाध्यक्षपदी भालचंद्र कुलकर्णी यांची निवड

IMG-20230114-WA0019

सारस पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विनायक साखरे आणि उपाध्यक्षपदी भालचंद्र कुलकर्णी यांची निवड*

पुणे : १९७२ मध्ये स्थापन झालेल्या *सारस अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.* ची संचालक मंडळाची निवडणूक (2023-2028) नुकतीच संपन्न झाली

. आज संस्थेच्या अध्यक्षपदी *श्री. विनायक साखरे* यांची आणि उपाध्यक्षपदी *श्री. भालचंद्र कुलकर्णी* यांची बिनविरोध निवड झाली आहे. श्री. साखरे हे सहकार खात्यातील निवृत्त अधिकारी असून सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख आहेत तर श्री. कुलकर्णी हे जनसंपर्क, माध्यम क्षेत्रात कार्यरत असून सहकार भारतीचे राष्ट्रीय प्रकाशन प्रमुख आहेत.

नवनिर्वाचित संचालक सदस्यांमध्ये सर्वश्री – गणेश धारप, शरद पायुगडे, प्रकाश मोडक, विनायक बेहेरे, रवींद्र रबडे, जितेंद्र चंपानेरकर, प्रितम बहिरट, नितीन जरांडे, सुनिल रसाळ, शिवाजी कोथमिरे, डॉ. सौ. विद्या माणकिकर व सौ. मृदुला कापरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती वंदना गलांडे पाटील यांनी काम पाहिले.सारस पतसंस्थेच्या पुणे शहरात एकूण ४ शाखा असून सुमारे ८० कोटींचा व्यवसाय आहे. नुकतेच संस्थेचा सुवर्ण महोत्सव संपन्न झाला आहे. ——-

Latest News