चिंचवड बिनविरोध करण्यासाठी पुढाकार पवारसाहेबांनी घ्यावा- चंद्रशेखर बावनकुळे

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – अंधेरी (पूर्व), मुंबई विधानसभेची जागा बिनविरोध करण्यात शरद पवारसाहेबांनी भुमिका घेतली. ती नंतर उद्धव ठाकरेंनी मान्य केली. त्यानुसार भाजपने आपला तेथील उमेदवार मागे घेतला होता. आताही चिंचवड बिनविरोध करण्यासाठी अंधेरीसारखाच पुढाकार पवारसाहेबांनी घ्यावा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आजकेले.

निधन झालेल्या अंधेरीच्या शिवसेना आमदारांच्या पत्नीला तेथे उमेदवारी देण्यात आली होती.तशीच चिंचवडमध्येही ती स्व. आ. जगतापांच्या पत्नीलाच दिली गेली आहे. त्यामुळे ही निवडणूकही बिनविरोध करावी, यासाठी मी सर्व विरोधी नेत्यांशी बोललो असून त्यांना भेटायलाही तयार आहे, असे बावनकुळे म्हणाले.

चिंचवडमधून अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते मिडियाशी बोलत होते. नेहमी विरोधकांवर कडाडून टीका करणाऱ्याा बावनकुळेंचा आजचे बोलणे हे खूपच सौम्य आणि नरमाईचे दिसले चिंचवडचे भाजप (BJP) आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या मतदारसंघात लागलेली पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आटोकाट प्रयत्न भाजपकडून सुरु आहेत.

दुसरीकडे, मात्र ती लढविण्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) ठरवले आहे. म्हणून ती बिनविरोध करण्यासाठी आता खुद्द शरद पवार यांनाच आज भाजपने साकडे घातलेआपल्या आयुष्यात एवढी मोठी रॅली बघितली नाही, या शब्दांत त्यांनी अश्विनी जगतापांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढण्यात आलेल्या जंगी पदयात्रेचे कौतूक केले. ही प्रचंड गर्दी पाहता चिंचवडकरांनी राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा असा विजय अश्विनीताईंना द्यावा, अशी विनंती त्यांनी चिंचवडकरांना केली.

Latest News