भारतीय विद्या भवनमध्ये १८ फेब्रवारी रोजी ‘ शिवार्पणम ‘–‘भारतीय विद्या भवन’,‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन


भारतीय विद्या भवनमध्ये १८ फेब्रवारी रोजी ‘ शिवार्पणम ‘—‘भारतीय विद्या भवन’,‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन
पुणे ःमहाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ शिवार्पणम ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नृत्यगुरू अनुजा बाठे यांची संकल्पना असलेला हा कार्यक्रम शिवांजली डान्स अॅकॅडमी सादर करणार आहे.
शनिवार , १८ फेब्रवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे.उडुपी येथील साई अन्नपूर्णी सुधाकर भरतनाट्यम सादर करणार आहेत. उडुपी,मुंबई,ठाणे येथील कलाकार सहभागी होणार आहेत
. अनुश्री कृष्णन,तन्वी बापट,अथर्व कुलकर्णी भरतनाट्यम सादर करणार आहेत.सृष्टी हिरवे,युक्ता जोशी,नम्रता पाटील,केया शाह कथक सादर करणार आहेत. आर्यही देशमुख,शुभवी जोशी,पुष्कला शास्त्री या अनुजा बाठे यांच्या शिष्या भरतनाट्यमच्या विशेष रचना सादर करणार आहेत. नृत्य प्रशिक्षण क्षेत्रातील मान्यवर गुरु या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.‘
भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १५० वा कार्यक्रम आहे . हा कार्यक्रम विनामूल्य आहे.