215 कसबा आणि चिंचवड निवडणुकीच्या माध्यमातून शिवसैनिकांनो आपल्याला बदला घ्यायचा…

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- चिंचवडचे आमदार नाना काटे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार बोलत होते. ते म्हणाले की, मराठी माणसांवर अन्याय होऊ नये; म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना काढली. शिवसैनिकांच्या जोरावर त्यांनी ती महाराष्ट्राच्या कानोकापऱ्यात पोचवली. त्यांच्याही काळात दोन बंडं झाली. पहिलं बंड १९९१-९२ मध्ये झालं, त्यानंतरच्या निवडणुकीत बंड केलेले सर्वजण पडले. त्यानंतर २००० नंतर दुसरं बंड झालं. त्याही निवडणुकीत गद्दारी करणारे पडले आणि आता हे तिसरं बंड झालेलं आहे. ‘इजा-बिजा’ झाली आता ‘तिजा’ दाखवयाची आहे यांना. त्याच्याशिवाय गप्प बसायचं नाहीशिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेयांना ज्या पद्धतीने मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. त्याचा बदला कसबा आणि चिंचवड निवडणुकीच्या माध्यमातून शिवसैनिकांनो आपल्याला घ्यायचा आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवारयांनी शिवसैनिकांना चार्ज केले. (शिवसेना कुणी काढली, हे सर्वांना माहिती आहे. ज्यांनी गद्दारी केली, त्यांचा शिवसेना काढणीमध्ये खारीचा, नखाचा तरी वाटा आहे का. काय संबंध आहे का त्यांचा.? शिवसेनाप्रमुखांनी तिकिट दिल्यामुळे शिवसैनिकांनी या बंडखोरांना निवडून आणलं आहे. महाराष्ट्रातील पानटपरी चालक, वडाप चालवणारे, साधी, वेगवेगळ्या जातीधर्मातील माणसं आमदार-खासदार झाली आहेत. हिंदुह्‌दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे ही लोकं आमदार-खासदार झाले आहेत, असेही पवार यांनी नमूद केलंपवार म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील सभेत सांगितलं होतं की आता माझं वयं झालंय. येथून पुढं शिवसेनाप्रमुखपदाची जबाबदारी माझ्यानंतर उद्धव ठाकरे सांभाळतील. एवढंच नाही तर युवा नेतृत्व म्हणून यापुढे आदित्य ठाकरे काम करतील, असे त्या जाहीर सभेत सांगितलं होतं. बाळासाहेबांनी सांगितलं असताना हे ‘सटरफटर’वाले मध्येच काय करायला लागले आहेत. निवडणुका लागू द्या, उद्या या बंडखोरांची काय अवस्था होणार आहे, ते तुम्ही बघाच विधान परिषद निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांनी कोकणच्या जागेसाठी आग्रह धरला होता. मात्र, शेकापचा विद्यमान आमदार असल्यामुळे ठाकरे यांनी मनाचा दिलदारपणा दाखवून ती जागा शेकापला सोडावी लागली होती. त्या पाचपैकी चार जागा महाविकास आघाडीच्या विचाराच्या निवडून आलेल्या आहेत. भाजप आणि शिंदे गटाला त्यांची जागा मिळाली आहे. निवडून आलेले म्हात्रे हेही शिवसेनेचे होते. मात्र, केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला उमेदवार मिळाला नाही. शेवटी शिवसेनेचा माणूस आयात करावा लागला.

Latest News