18 फेब्रुवारी रोजी टेक्नोव्हेशन २०२३’ विज्ञान तंत्रज्ञान प्रदर्शन –विज्ञान आश्रम आणि एल.टी.आय.माईंडट्री कडून आयोजन

IMG-20230216-WA0012

फेब्रुवारी रोजी टेक्नोव्हेशन २०२३’ विज्ञान तंत्रज्ञान प्रदर्शन —————-विज्ञान आश्रम आणि एल.टी.आय.माईंडट्री कडून आयोजन

पुणे :शासकीय अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रयोगांचे ‘टेक्नोव्हेशन २०२३’ हे विशेष विज्ञान तंत्रज्ञान प्रदर्शन विज्ञान आश्रम आणि एल.टी.आय.माईंडट्री यांच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उदघाटन १८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता एल.टी.आय.माईंडट्री (शिवाजीनगर) येथे होईल. या प्रदर्शनाचे हे चौथे वर्ष आहे. ३६ शाळांचे इयत्ता आठवी ते दहावी चे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

समाज आणि भोवतालच्या समस्या समजावून घेऊन त्यावर विज्ञान तंत्रज्ञानाची उत्तरे शोधणारे प्रकल्प या प्रदर्शनात मांडण्यात येणार असल्याची माहिती विज्ञान आश्रम चे संचालक डॉ. योगेश कुलकर्णी यांनी दिली.

‘इमॅजिन, इन्व्हेन्ट अँड इन्स्पायर’ हे या प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे. स्मार्ट बुजगावणे, कंपोस्ट सिव्ह मशीन, लो कॉस्ट ट्रेड मिल, थ्री डी प्रिंटेड विंडो ग्लास क्लिनर, फरशी पुसण्यासाठी स्मार्ट मॉप, सुपारी सोलण्याचे यंत्र, मँगो पल्प स्टरर, धार करणारे यंत्र, बहुपयोगी टेबल, फर्टिलायझर इक्विपमेंट असे अभिनव प्रयोग हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. प्रदर्शनातच प्रयोगांचे परीक्षण करून पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. प्रवेश निमंत्रितांसाठी आहे

Latest News