बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता :राज ठाकरे


मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) – केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विटरवर पहिली प्रतिक्रिया दिली
.राज ठाकरे यांनी ट्विटरवर बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा एक भावनिक व्हिडीओ शेअर केलाय.यावेळी त्यांनी एक मेसेज देखील लिहिला आहे बाळासाहेबांनी दिलेला शिवसेना हा विचार किती अचूक होतार ते आज पुन्हा एकदा कळलं, असं राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत
.एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून सत्तांतर घडवून आणलं होतं. या घडामोडींनंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता. त्यानंतर कधीही निकाल येणं अपेक्षित होतं.निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आलाय. या निकालामुळे ठाकरे गटाला खूप मोठा झटका मिळाल्याचं मानलं जातंय.