पोटनिवडणुकीपर्यंतच ठाकरे गटाला ‘मशाल’त्यानंतर हे चिन्ह व पक्षाचे नाव वापरता येणार नाही….


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
निवडणूक आयोगाने विधिमंडळ आणि संसदेतील बहुमताच्या आधारावर शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव दिले आहे. अंधेरी पोटनिवडणुकी दरम्यान दिलेलं त्यांच ढाल तलवार हे चिन्ह आयोगाने गोठवलं आहे.आता कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंतच ठाकरे गटाला ‘मशाल’आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे नाव वापरता येणार आहे. त्यानंतर हे चिन्ह व पक्षाचे नाव वापरता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने आपल्या ऑर्डरमध्ये नमूद केले आहे.यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसला आहे.या विरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार आहे. त्यामुळे कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीनंतर ठाकरे गटाला नवीन चिन्हासाठी आयोगाकडे अर्ज करावा लागणार आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या वेळी मशाल हे चिन्ह निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला दिले होतेकेंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिले आहे. काल (शुक्रवारी) निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामध्ये आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. त्यामुळे ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का बसला आहे. तर उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह दिले आहे. या चिन्हाबाबत आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे.केंद्रीय निवडणुक आयोगाने ठाकरे गटाला कसबा पेठ निवडणुकीपर्यंतचं मशाल चिन्ह वापरण्यास परवानगी दिली असली तरी ठाकरे गट त्या चिन्हावर नव्याने दावा करू शकतात. दरम्यान समाजवादी पार्टीने पुन्हा एकदा या चिन्हावर दावा केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहेकसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी ठाकरे गटाने आपला उमेदवार दिलेला नाही. यामुळे या निवडणुकीत तरी ठाकरे गटाकडून मशाल चिन्हाचा वापर होणार नाही. पण कसबा पेठ निवडणुकीनंतर म्हणजे 26 जानेवारीनंतर ठाकरे गटाकडून मशाल हे चिन्ह सुद्धा जाणार आहे. त्यामुळे कसबा पेठ निवडणुकीच्या निकालानंतर आता उद्धव ठाकरेंकडे निवडणुक चिन्ह नसेल. ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर समता पार्टीने पुन्हा एकदा दावा केला आहे. ठाकरे गटाला मशाल चिन्ह देऊ नये, अशी मागणी समता पार्टी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे वृत्त आहे. याबाबत समता पार्टी निवडणूक आयोगाला निवेदन देणार आहे.