“2024ला विरोधी पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली तर भाजपचा सुपडा साफ


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी काँग्रेससह विरोधीपक्षांना एकत्र येत आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचे पुन्हा आवाहन केले आहे. “विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली तर भाजपला १०० जागांच्या आत रोखता येईल, ” असे नीतीश कुमार म्हणाले
“आम्हाला केवळ बदल हवा आहे.भारत जोडो यात्रेनंतर आता काँग्रेसने समोर येऊन विनाविलंब विरोधकांची मोट बांधली पाहिजे. सर्वजण एकजूट झाले तर भाजपला 100 च्या आत रोखता येईल यात कोणताही शंकता नाही. पंतप्रधान पदाच्या मुद्यावर माझी कोणतीही वैयक्तिक इच्छा नाही. सर्वजण ठरवतील ते मला मान्य असेल. पण आता काँग्रेनसे पुढे येऊन निर्णय करावा. विरोधकांना एकजूट करण्यात आला उशीर होता कामा नये,”
असे ते म्हणाले.”काँग्रेसने पुढाकार घेऊन आता विरोधकांची मोट बांधली पाहिजे. यासाठी उशीर करता कामा नये, विरोधपक्षांनी एकत्र येऊन ठरवले पाहिजे कोण कुणाच्या विरोधात निवडणूक लढवेल, कुणासोबत युती करायची,” असे नीतीश कुमार म्हणाले.
. “विरोधक एकत्र आले नाही तर पुन्हा एकदासत्तेत येईल, असे ते म्हणाले.नीतीश कुमार हे पाटण्यात आयोजित भाकपच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. ते म्हणाले, “2024 मध्ये सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली तर भाजपचा सुपडा साफ होईल. आज स्वातंत्र्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे सर्वच जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन वाटचाल करावी लागेल. एनडीएतून बाहेर पडल्यानंतर सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आमचे स्वागत केले,
यावेळी काँग्रेस नेते सलमान खुर्शीद उपस्थित होते. त्यांच्याकडे पाहून नीतीश कुमार म्हणाले, “विरोधक एकजूट झाले तर भाजपला 100 च्या आत रोखता येईल. यात कोणतीही शंका नाही. बिहारमध्ये विरोधक एकजूट होऊन काम करत आहेत.दिल्लीत सोनिया व राहुल गांधींची मी भेट घेतली. त्यानंतर आता तुमच्या माध्यमातून काँग्रेस नेतृत्वाला आवाहन विरोधकांची एकजूट करण्याचे आवाहन करत आहे,”