गुंडगिरी व दडपशाहीला मतदार थारा देणार नाहीत – सतेज पाटील

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना मिळत असलेल्या वाढत्या पाठींब्यामुळे भाजप नेत्यांची धावपळ सुरू आहे. राज्यासह केंद्रातील मंत्री मतदारसंघात तळ ठोकून आहेत. पंचवीस वर्षापासून एकहाती सत्ता असलेला मतदार संघ हातातून जात असल्याचे पाहुन आता ते गुन्हेगारांचा आधार घेत आहेत, असा आरोप राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज (बंटी) पाटील यांनी केला. कसब्यातील सुजान आणि सुशिक्षित मतदार भाजपच्या दडपशाहीला व गुंडगिरीला थारा देणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार दिप्ती चवधरी उपस्थित होते.
सतेज पाटील म्हणाले, कसबा मतदार संघात १९९५ पासून भाजपचे आमदार निवडून येत आहेत. या काळात भाजपने मतदार संघातील कामेच केली नाहीत. आता ते मतदार संघातील कामे करण्यासाठी निवडून देण्याची भाषा करत आहेत. ज्यांनी आजवर कामे केली नाहीत, ते आता काय कामे करणार, हे मतदारांनी ओळखल्याने जनतेच्या हाकेला धावून जाणारे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जनतेचा मोठा पाठींबा मिळत आहे. धंगेकरांचा वाढता पाठिंबा पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मतदार आमिषाला बळी पडत नाही पाहून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना घेऊन मंत्री फिरत आहेत त्यासोबत मोकातील आरोपी असल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. कसब्यातील मतदार सुज्ञ आहे. तो अशा गोष्टी सहन करणार नाही आणि धंगेकर यांनाच प्रचंड मताधिक्याने विजयी करेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीसाठी अत्यंत चांगले वातावरण आहे. ही निवडणूक आगामी महापालिका निवडणुकीसाठी निर्णायक राहील. काँग्रेसचे मित्र पक्ष देखील ताकदीने धंगेकरांच्या मागे उभे आहेत. सिलेंडर चे दर कमी करा, अशी मागणी महिला करत आहेत. विविध वस्तूंच्या महागाईचे प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा परिणाम भाजपला भोगावा लागणार आहे. मतदारांचा प्रतिसाद मिळत नसल्याने भाजप नेत्यांचा आत्मविश्वास गमावला आहे. त्यामुळे सहानुभुती नसल्याने आजारी असतानाही खासदार गिरीष बापट यांना प्रचारात उतरवण्यात आले.
निवडणूक आयोगाच्या शिवसेनेबाबत दिलेल्या निर्णयामुळे उद्भव ठाकरे यांच्याबद्दल जनतेत सहानुभूती वाढली आहे. एखादा पक्षच दुसरीकडे देणे हे येथील लोकांना सहन होणारे नाही. आदित्य ठाकरे राज्यभर दौरे करत आहेत. त्यांना चांगला पाठिंबा मिळत आहे. शिवसैनिक चवताळून उठला आहे. याचा फायदा महाविकास आघडीला होईल, असेही पाटील म्हणाले. दरम्यान, जनता दल सेक्युलर, लोकराज्य जनता पार्टी, वर्ल्ड ह्यूमन राईट, छावा संघटनेने महाविकास आघडीचे उमेदवार धंगेकर यांना पाठिंबा दिला आहे.