गौतमी पाटील व्हिडिओ व्हायरल, याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश…

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – तिच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी उलट-सुलट भाष्य केलं आहे. राज्य महिला आयोगाने देखील या व्हिडिओची गंभीर दखल घेतली असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा (Rupali Chakankar) यांनी सायबर (Cyber Police) याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेतगौतमीचा हा व्हिडीओ पुण्यातील एका स्टेज शोचा आहे. या व्हिडीओत गौतमी कपडे बदलताना दिसत आहे. गौतमीच्या समर्थनात अनेकांनी प्रतिक्रिया देत हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना सुनावलं आहे. या प्रकरणी आता पुणे पोलिसाकडे (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नृत्यागंना गौतमी पाटील ही समाज माध्यमांवर नेहमीच चर्चेत असते. तिच्या दिलखेचक अदांनी अनेकांना वेड लावलं आहे, पण सध्या गौतमीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये गौतमी कपडे बदलताना दिसत आहे.पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एका महिलेने याबाबत तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला आणि सहकाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही सांगण्यात आले आहे. हा व्हिडीओ काहींनी फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला होता.पोलीस याबाबत आता सखोल चौकशी करीत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी टि्वट करीत या विषयावर प्रतिक्रिया दिला आहे

रुपाली चाकणकर म्हणाल्या..

“महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे. लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. एकंदरीतच महिलांच्याप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील,” असे रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

Latest News