तपस्या प्रतिष्ठान, तळागाळातील वंचित लोकांना शासकीय सेवा मिळण्यासाठी प्रयत्नशील

तपस्या प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था सन 2018 पासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांकरीता उपलब्ध असलेल्या विविध सरकारी योजनांचा लाभ तळा गाळातील नागरीकांना मिळावा यासाठी तपस्या संस्थेमध्ये नियमित स्वरुपात शिबिरे आयोजित केली जातात.याच उपक्रमाचा भाग म्हणून पुण्यातील पानमळा वसाहत व जनता वसाहत येथे तपस्या संस्था पोस्ट विभाग जिल्हा आरोग्य विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालय सिंहगड रोड, पुणे यांचा संयुक्त विद्यमाने शिबीर आयोजित करण्यात येत आहे

. आणि अनेक नागरिकांना सुकन्या योजना, अपघाती विमा योजना, आयुष्मान भारत योजना, ई- श्रम योजना, आधारसंबंधी सेवा यांचा लाभ मिळवून दिला गेला.शिबिरांमध्ये काढल्या गेलेल्या कार्डचे वाटप करण्यासाठी दि. 2702 2023 रोजी सिंहगड रस्त्यावरील पानमळा वसाहतीत कार्यक्रम आयोजित केला गेला

. सदर कार्यक्रमास मा. दिपक पखाले (झोनल मेडिकल ऑफिसर) मा. प्रज्ञा कदम (जिल्हा पर्यवेक्षक, MJPJAY), मा. श्री. महेश शिंदे (पी.आर.आय, पोस्ट ऑफिस), मा. डॉ. काकडे (वार्ड मेडिकल ऑफिसर, मनपा) व मा. श्री संदीप खेराडे (आरोग्य निरीक्षक) हे अधिकारी उपस्थित होते.त्यांनी उपस्थितांना संबंधित विभागाद्वारे राबवल्या जाणाऱ्या योजनांबाबत मार्गदर्शन केले.

तपस्या संस्थेच्या वतीने सौ. रमा लोंढे, सौ. रागिणी कांबळे, श्री. रविंद्र जाधव व कु. चैत्राली आंबले यांनी कार्यक्रमाचा कार्यभार सांभाळला.पुढील 2 वर्षात 5000 हून अधिक नागरिकांना या योजनांचा लाभ मिळवून देणे हे संस्थेचे उद्दिष्ट असून वस्तीपातळीवर जास्तीत जास्त नागरिकांनी तपस्या संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या मोफत सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन तपस्या संस्थेचे प्रकल्प समन्वयक श्री. रविंद्र जाधव यांनी केले आहे.