‘श्रावण रंग’ कार्यक्रमांत आरोग्य आणि पर्यावरण विषयक जागृती


‘श्रावण रंग, सप्तरंग’ या विशेष कार्यक्रमाचे १४ रोजी आयोजन

पुणे: ऑनलाइन परिवर्तनाचा सामना-

‘नील मल्टी इव्हेंट्स’ च्या वतीने ‘श्रावण रंग, सप्तरंग’ या विशेष कार्यक्रमाचे १४ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. निवारा सभागृह, नवी पेठ येथे सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे

मधुमेह तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत कणसे हे ‘मधुमेह :समज, गैरसमज ‘ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत ,तर पर्यावरण अभ्यासक सतीश खाडे हे ग्लोबल वॉर्मिग च्या संदर्भात ‘सगळं जग टायटॅनिक चे प्रवासी’ या विषयावर मागदर्शन करणार आहेत.

याच कार्यक्रमात डॉ .अनघा राजवाडे या ‘आया सावन झुमके ‘ हा हिंदी ,मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर करणार आहेत.

सौ . क्रांती शहा सूत्रसंचालन करणार आहेत.’नील मल्टी इव्हेंट्स’ च्या संस्थापक सौ. नीलम बेंडे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .प्रवेश विनामूल्य आहे.

Latest News