वीर गोगादेव जन्मोत्सव मोठ्या हर्षोल्लासात संपन्न

येरवडा : ऑनलाइन परिवर्तनाचा सामना- वाल्मीकी समाजाचा वीर गोगादेव जन्मोत्सव मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला, यावेळी वीर गोगादेव यांची रथांमधून निशानाची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती, यावेळी मोठ्या संख्येने भक्तगण नागरिक उपस्थित होते.
वाल्मिकी समाजाच्या वतीने श्रावण महिन्यापासून मानाची काठी बसविण्यात येत, या काठीचे महिनाभर उपासना भजन, कीर्तन या माध्यमातून सेवा सुरू असते. गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी निशाणाची मिरवणुक काढून या उत्सवाच्या समारोप होतो. याप्रसंगी येरवडा विभागाचे अध्यक्ष भगत किशोर निंदानिया, महासचिव लेखराज साळुंखे, कोषाध्यक्ष भीम वाघेला, प्रमोद कोटियाना, किशोर सोलंकी, चंद्रकांत सोलंकी, योगेश वाघेला, राजेश मकवाना तसेच भक्तगण नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. वीर गोगादेव यांची भव्य मिरवणूक बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

Latest News