गोकुळअष्टमी निमित्ताने कृष्ण जन्मोत्सव आणि दहीहंडीचे आयोजन


खडकी : ऑनलाइन परिवर्तनाचा सामना- अग्रवाल समाज खडकीच्या वतीने गोकुळअष्टमीच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सव मोठ्या हर्षोउल्हास साजरा करण्यात आला. दहीहंडीचे देखील करण्यात आले होते. अग्रवाल समाजाच्या युवकांनी मोठ्या आनंदात दहीहंडी फोडून उपस्थितांचे मने जिंकले.
अग्रवाल समाज खडकीच्या वतीने श्रीकृष्णचे जन्मोत्सव साजरा करण्यात आला होता, यावेळी श्रीकृष्णाला वस्त्र परीधान करण्यासाठी बोली देखील लावण्यात आली होती. राहुल अग्रवाल यांनी बोली जिंकल्याने त्यांच्या हस्ते आरती तसेच वस्त्रे परिधान करण्यात आले
असल्याचे अध्यक्ष दीपक अग्रवाल यांनी सांगितले. भगवान श्रीकृष्णाची आरती संपन्न झाली, यावेळी दहीहंडीचे देखील आयोजन करण्यात आले होते. युवकांनी मोठ्या हर्षोउल्हासात दहीहंडी फोडल्याने उपस्थितांनी एकच जल्लोष केला. दहीहंडीवर पाण्याचा देखील वर्षाव करण्यात येत होता.
युवा वर्ग हिंदी गाण्यावर थिरकत होती. दहीहंडी नंतर भक्तगणांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी सेक्रेटरी राहुल अग्रवाल, प्रमोद बंसल, मनीष गोयल, पवन अग्रवाल, पूर्णेश अग्रवाल, मुकेश अग्रवाल तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.