राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पिंपरी-चिंचवड युवक अध्यक्ष पदी – शेखर काटे तर शहर कार्याध्यक्षपदी प्रसाद कोलते


**राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पिंपरी-चिंचवड युवक अध्यक्ष पदी – शेखर काटे तर शहर कार्याध्यक्षपदी प्रसाद कोलते, प्रसन्ना डांगे, तुषार ताम्हाणे*
पिंपरी, दि. ०९ (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यकारिणीत जनतेत स्थान असणाऱ्या युवक नेतृत्वास सामावून घेण्याच्या दृष्टीकोनातून शहराच्या युवक अध्यक्ष पदी शेखर काटे तर कार्याध्यक्षपदी प्रसाद कोलते, प्रसन्ना डांगे, तुषार ताम्हाणे यांची आज (दि. ०९) नियुक्ती करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागदर्शनाने आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शेखर काटे व सहकारी प्रसाद कोलते, प्रसन्ना डांगे, तुषार ताम्हाणे यांना निवडीचे पत्र दिले
.पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. तो अधिकाधिक मजबूत रहावा या दृष्टीकोनातून आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या युवक नेतृत्वांना कार्यकारिणीत सामावून घेण्यात येत आहे.
त्याच भूमिकेतून शनिवार (दि. ०९) युवक अध्यक्षांसह तीन शहर कार्याध्यक्षांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या हस्ते तसेच युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, महिला अध्यक्षा सौ.रूपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीत पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात करण्यात आल्या आहेत. शेखर काटे हे शहरातील युवा नेतृत्व आहेत.
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघासोबत येणाऱ्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर सक्षम आणि जनतेमध्ये स्थान असणाऱ्या नेतृत्वास राष्ट्रवादीकडून कार्यकारणीमध्ये स्थान देण्यात येत आहे.यावेळी प्रदेश युवक उपाध्यक्ष विशाल वाकडकर, सरचिटणीस विशाल काळभोर, प्रतिक साळुंखे, प्रशांत सपकाळ, नगरसेविका उषा (माई) काटे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
शहरात राष्ट्रवादी जोमाने वाढावी म्हणून मी कार्यरत राहणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, युवा नेते पार्थदादा पवार आणि शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा रथ युवकांच्या माध्यमातून वेगाने वाटचाल करेल याची मला खात्री आहे. पक्षाने मला दिलेल्या संधीचे मी सोने करेन, असा विश्वास देतो.शेखर काटे, युवक अध्यक्ष