भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या वतीने’ग्राहक संरक्षण कायदे’ विषयावर कार्यशाळा


पुणे : ऑनलाइन परिवर्तनाचा सामना-
‘सेंटर फॉर कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रू लॉ ‘ आणि भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या वतीने ९ सप्टेंबर २०२३ रोजी ‘ग्राहक संरक्षण कायदे’ या विषयावर एक दिवसीय ऑनलाइन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.आजच्या ग्राहकांना नवनवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी या कार्यशाळेच्या माध्यमातून निवारण यंत्रणेबद्दल माहिती देण्यात आली. या कार्यशाळेच्या माध्यमातून कायद्याच्या विद्यार्थ्यांना न्यायालयीन कार्यवाहीची अद्ययावत माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते न्या. मकरंद एस. कर्णिक (मुंबई), गोवा लोकायुक्त न्या. अंबादास एच. जोशी (निवृत्त), सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ई-समितीचे अध्यक्ष न्या. रवींद्र सी. चव्हाण (निवृत्त) , आणि प्रा. डॉ. सुशीला (दिल्ली) व ऍड. शौर्य कृष्ण(दिल्ली) हे होते . या कार्यशाळेचे आयोजन भारती विद्यापीठ विधी शाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेज, पुणेच्या प्रभारी प्राचार्य डॉ. उज्वला बेंडाळे ,उपप्राचार्य डॉ. ज्योती धरम ,सौ. उज्ज्वला साखळकर, डॉ. रोहित एच. सुरवसे आणि उमेश जवळीकर यांनी केले .