‘आनंद मल्हार’ नृत्याविष्काराला चांगला प्रतिसाद

भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम

पुणे ः ऑनलाइन परिवर्तनाचा सामना-

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘आनंद मल्हार’ या नृत्याविष्कार कार्यक्रमाला रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला.हा कार्यक्रम रविवार, १० सप्टेबर २०२३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे आयोजित करण्यात आला होता. अथर्व चौधरी संचालित ‘ओजस,पुणे’ यांच्यातर्फे हा कार्यक्रम प्रस्तुत केला गेला .कामाक्षी हंपीहोली( कथक),रिद्धी पोतदार(भरतनाटयम),अमृता सिंग( कुचिपुडी),जीत घोष(ओडिसी),दिशा रावत(कथक) हे कलाकार सहभागी झाले. त्यांच्या नृत्याविष्कारांना चांगला प्रतिसाद मिळाला

हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १८० वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले.डॉ परिमल फडके,तमन्ना नायर, किशोरी हम्पीहोई, भरतनाट्यम नर्तिका मीरा श्रीनारायणन, अथर्व चौधरी,मुर्डेश्वर आदी उपस्थित होते.डॉ. अश्विनी चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. विविध पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले.

Latest News