PCMC: महानगरपालिकेत नोकरी देण्याच्या आमिषाने चौघांची फसवणूक, 3 जणांविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…

पिंपरी चिंचवड- ऑनलाइन परिवर्तनाचा सामना- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कायमस्वरुपी लीपिकाची नोकरी मिळवून देतो असे आमिष दाखण्यात आले. तसेच त्यांच्याकडून प्रत्येकी पाच- पाच लाख रुपये घेण्यात आले. याबाबत आपली झाल्याचे लक्षात येताच तरुणांनी पोलिसांत धाव घेतली.याप्रकरणी सतीश कुमार भालेराव, शिवदर्शन चव्हाण आणि विश्वजीत चव्हाण या तिघांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या फसवणूक प्रकरणात पिंपरी चिंचवड येथील काही प्रतिष्ठित लोकांचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. संगमनेर पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरी देण्याच्या आमिषाने चौघांची फसवणूक केल्याचा धक्कादायक संगमनेर शहरातून समोर आला आहे. संगमनेर तालुक्यातील चौघांना तब्बल २२ लाख १० हजार रुपयांचा गंडा घातल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ३ जणांविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहेयाबाबत सविस्तर माहिती अशी की,  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत (Pimpari Chinchwad) नोकरीस लाऊन देतो असे गून तालुक्यातील चौघांची फसवणूक झाली आहे. या धक्कादायक प्रकाराने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Latest News