मोदी सरकारने इंडिया आघाडीचा इतका धसका घेतलाय की नाव बदलून टाकले… – खासदार सुप्रिया सुळे

ऑनलाइन परिवर्तनाचा सामना- देशाचे नाव इंडिया बदलून भारत असं केलं जात आहे. या वादावर सुप्रिया सुळेंनी पुढे म्हटलं की, “मोदी सरकारने इंडिया आघाडीचा इतका धसका घेतलाय की नाव बदलून टाकले आहे. ते इतका धसका घेतील असं मला वाटलं नव्हतं खासदार सुप्रिया सुळे आज पंढरपूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरकारने कांदा आणि टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर आयात केली आहे. अशात दर पडले आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.विरोधी पक्षाने आपल्या आघाडीला इंडिया आघाडी असं नाव दिलं आहे. या नावानंतर केंद्र सरकारने देशाचं इंडिया नाव बदलून भारत ठेवण्याच्या हालचालींना सुरुवात केल्याचं म्हटलं जातंय. केंद्र सरकारने जी-20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रपतींचा उल्लेख ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’, असा केला. त्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. केंद्र सरकारने इंडिया नाव बदलून भारत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या कामासाठी ते तब्बल १४ हजार रुपये कोटींचा खर्च करणार आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.लोकसभेत कांद्याच्या प्रश्नावर सर्वाधिक आवाज मी उठवल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. यावेळी विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील देखील उपस्थित होते.

Latest News