वाढदिवसाचा खर्च टाळून राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची इर्शाळवाडीला दीड लाखाची मदत


वाढदिवसाचा खर्च टाळून राजेंद्र जगताप यांची इर्शाळवाडीला दीड लाखाची मदत
पिंपरी, प्रतिनिधी :आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून वाढदिवस साधेपणाने साजरा करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपळे गुरव येथील माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एक लाख एक्कावन हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
यावेळी राजेंद्र जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष अरुण पवार, संदीप राठोड, कांतिभाई गांगानिया, मनीष शेठीया आदी उपस्थित होते.
दरम्यान, वाढदिवसानिमित्त 5 लाखापर्यंत मोफत वैद्यकीय सेवा आयुष्यमान भारत योजना मोहिम हाती घेण्यात आली असून, पिंपळे गुरव, नवी सांगवी परिसरातील नागरिकांचा पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी परिसरातील 438 नागरिकांना कार्डचे वाटप करण्यात आले.
परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, अध्यात्मिक, क्षेत्रातील मान्यवरांनी राजेंद्र जगताप यांना भेटून शुभेच्छा दिल्या.——
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून इर्षाळवाडी दुर्घटनाग्रस्ताना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. या नैसर्गिक दुर्घटनेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, तर काहींवर बेघर होण्याची वेळ आली. या नैसर्गिक दुर्घटनेची जाणीव मनामध्ये ठेवून या गावाच्या पुनर्वसनासाठी एक लाख एकावन्न हजाराचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला. – राजेंद्र, जगताप, माजी नगरसेवक पिं. चिं. मनपा.