‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिफॉर्मिंग सोसायटी अँड लॉ ‘ विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद


पुणे : ऑनलाइन परिवर्तनाचा सामना-
भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज आणि ‘सोशल सायन्स अँड मॅनेजमेंट वेलफेअर असोसिएशन’ च्या वतीने ‘मल्टिडिसीप्लेनरी रिसर्च इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिफॉर्मिंग सोसायटी अँड लॉ’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही ऑनलाईन परिषद दि.९ आणि १० सप्टेंबर रोजी पार पडली.भारती विद्यापीठाच्या विधी शाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ.उज्वला बेंडाळे या परिषदेच्या निमंत्रक होत्या.
डॉ.पवन दुग्गल(दिल्ली),कोरिना सुजेदी(रोमानिया),एड.साक्षर दुग्गल(दिल्ली),गणेश हिंगमिरे(पुणे),रूबेन गार्सिया (पेरू),नाडा रटकोव्हिक(क्रोएशिया),डॉ.स्वप्नील बंगाली(वडोदरा),डॉ.अनुराधा गिरमे,एड.राजस पिंगळे,विंध्या गुप्त,दिव्या मित्तल,उमेश जेवळीकर,डॉ.उदय शंकर(पश्चिम बंगाल),डॉ.अमन मिश्रा,डॉ.जय भोंगळे,डॉ.राजलक्ष्मी वाघ आदी मान्यवर सहभागी झाले.रश्मी दुबे,अनया मापारी,मुकुल आर्य यांनी संयोजन केले. या परिषदेला चांगला प्रतिसाद मिळाला.अनेक संशोधनपर निबंध सादर करण्यात आले.