राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पिंपरी-चिंचवड क्रिडा सेल अध्यक्ष पदी – दत्तात्रय झिंझुर्डे


पिंपरी ऑनलाइन परिवर्तनाचा सामना- :- १४ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मा.महापौर संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे, कार्याध्यक्ष फजल शेख, यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच मा. दत्तात्रय (नाना) झिंजुर्डे यांची पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) क्रिडा सेल अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी युवक अध्यक्ष शेखर काटे, अल्पसंख्यांक अध्यक्ष युसूफ कुरेशी, युवक कार्याध्यक्ष प्रसाद कोलते, तुषार ताम्हाणे, प्रसन्ना डांगे, उमेश काटे, लवकुश यादव, गणेश खराडे इत्यादींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.