ग्रीन बिल्डिंग कम्प्लायन्स’ विषयावरील परिषदेला चांगला प्रतिसाद


*’ग्रीन बिल्डिंग कम्प्लायन्स’ विषयावरील परिषदेला चांगला प्रतिसाद-‘इशरे’,’आयजीबीसी’,’एन्साव्हीयर’ ,’अर्कलाईट’ यांच्यावतीने आयोजन
पुणे:इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स (इशरे, पुणे) , इंडियन ग्रीन बिल्डींग कौन्सिल (पुणे विभाग),’एन्साव्हीयर’ ,’अर्कलाईट’ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘एनर्जी इफिशियन्सी ,फ्रेश एयर,सस्टनॅबिलिटी अँड डीकार्बनायझेशन इन ग्रीन बिल्डिंग कंप्लायन्स’ या विषयावरील एक दिवसीय परिषदेला चांगला प्रतिसाद मिळाला
. पीवायसी जिमखाना येथे १३ सप्टेंबर रोजी झालेल्या या परिषदेला या क्षेत्रातील दोनशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. ‘एन्साव्हीयर’ चे व्यवस्थापकीय संचालक दिनेश सेमवाल, ‘अर्कलाईट’ चे व्यवस्थापकीय संचालक विक्रम बापट, इशरे(पुणे) चे अध्यक्ष नंदकिशोर कोतकर,आयजीबीसी( पुणे )चे अध्यक्ष जे.पी. श्रॉफ,इशरे(पुणे) चे डॉ.अंशुल गुजराथी, वीरेंद्र बोराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या क्षेत्रातील तज्ज्ञ,व्यावसायिक,विविध संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले. आशिष रखेजा, ऋषिकेश मांजरेकर,अमृता कटपेलवार यांनी मार्गदर्शन केले.चर्चासत्राचे संचालन डॉ.पूर्वा केसकर यांनी केले. या परिषदेमध्ये कार्बन उत्सर्जन कमी करणे, ऊर्जा सक्षमता वाढवणे आणि त्याद्वारे ग्रीन बिल्डिंग उभारणीला प्रोत्साहन मिळण्यासाठी आवश्यक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली
.आधुनिक तंत्रज्ञान आणि विचार यावर सादरीकरण झाले. त्यामध्ये एम्बिली मेनन,डॉ.अविनाश, मार्क टेकन, विवेक जोशी, शंकर, अनंत इत्यादींनी सहभाग घेतला. आर्किटेक्ट,इंजिनियर्स अँड सर्व्हेयर्स असोसिएशनसह अनेक संस्थाचे सहकार्य मिळाले. ‘ग्रीन बिल्डिंग उभारणीच्या महत्वाच्या मुद्द्यांवर इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्सला आम्ही सहकार्य करू.त्यातून होणाऱ्या चर्चेतून सकारात्मक बदल घडून येतील’,असे प्रतिपादन दिनेश सेमवाल यांनी केले .
‘पर्यावरण जपण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी या परिषेदेचे विचार मंथन उपयुक्त ठरेल’,असे डॉ अंशुल गुजराथी यांनी सांगितले.