अभियांत्रिकी उत्तीर्ण, मात्र तीन वर्ष उलटली तरीही नियुक्ती नाही….

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) १८ मार्च २०२० मध्ये महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली. सर्व प्रक्रिया पार पडत मे २०२२ मध्ये गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. आयोगाने ऑगस्ट २०२२मध्ये निवड झालेल्या उमेदवारांची शिफारस केली. मात्र वैद्यकीय चाचणीनंतरही अजूनही उमेदवारांना नियुक्ती मिळालेली नाही.

जिरायती क्षेत्र असतानाही सूरजच्या कुटुंबीयांनी त्याला मोठ्या कष्टाने अभियंता बनविले. सूरजनेही केवळ अभियंत्यावर समाधान न मानता अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहिले आणि अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२० उत्तीर्ण झाला. मात्र मागील तीन वर्ष उलटून गेली तरीही त्याला नियुक्ती मिळालेली नाही. या रखडलेल्या नियुक्तीमुळे आज सूरजवर अक्षरशः गुरे पाळण्याची वेळ आली असून, २१७ पात्र उमेदवारांवर कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे

सूरज सांगतो, ‘‘आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांसंबंधीच्या आरक्षणाच्या विषयावरून नियुक्ती रखडल्याचे काही उमेदवार सांगतात. परंतु न्यायालयात चाललेले प्रकरण हे २०१९ मधील भरतीचे आहे.

विशेष म्हणजे त्यावर माननीय न्यायालयाने निकाल दिला असून, उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र आमची २०२० मधील उमेदवारांना अजूनही नियुक्ती का नाही.’’ २०१९ मधील उमेदवारांप्रमाणेच आम्हालाही ९० टक्के जागांवर नियुक्ती द्यावी अशी मागणी उमेदवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

उमेदवारांचे प्रश्न…

– १४ महिन्यांनंतरही नियुक्ती का रखडली?

न्यायालयातील प्रकरण २०१९ च्या भरतीसंदर्भात आहे. मंग २०२० च्या उमेदवारांवर अन्याय का?

– आरक्षणाच्या जागा राखीव ठेऊन उरलेल्या ९० टक्के जागांवर नियुक्ती का नाही?

शिफारसप्राप्त उमेदवारांची अडवणूक का?

शिफारस झाल्यानंतरही नियुक्ती रखडल्यामुळे करिअर संदर्भात कोणताच निर्णय घेता येत नाही. इतर सेवा परीक्षांची नियुक्ती होत, पण आमच्याच नियुक्तीबद्दल निर्णय नसल्याने उमेदवार आता हवालदील झाले आहे. न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून आम्ही नियुक्ती घेण्यास तयार आहोत. मोहित जाधव, पात्र उमेदवार

Latest News