पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाची 580 कोटीची विक्रमी वसुली

पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाच सामना ) सहा महिन्यांत 60 टक्यांपेक्षा जास्त मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. त्यामुळे आता आर्थिक वर्षातील 6 महिन्यात उर्वरित 40 टक्के मालमत्ता धारकांकडून कर संकलन करण्यासाठी लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने अनेक वर्षांपासून थकीत असलेला कर वसूल आणि चालू कर 100 टक्के वसुली करणे हेच विभागाचे एकमेव ध्येय असणार आहे. यासाठी मालमत्ता जप्त करण्यासारखा कटू निर्णय घ्यावा लागला आहे. :- नीलेश देशमुख सहायक आयुक्तपिंपरी चिंचवड महानगरपालिका

40 हजार 341, थेरगावमध्ये 33 हजार 838 तर चिंचवडमध्ये 33 हजार 715 मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. तर सर्वात कमी तळवडे झोनमध्ये 5 हजार 140 मालमत्ता धारकांनी कर भरला आहे. 41 हजार जणांना जप्ती नोटीसा तर 36 हजार मालमत्ता धारकांना जप्ती पत्र 2023-24 या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत कर संकलन विभागाने 41 हजार, 307 जणांना जप्ती नोटीसा तर 36 हजार 719 मालमत्ता धारकांना जप्ती पत्रे धाडली आहेत

. या मालमत्ता धारकांकडे तब्बल 671 कोटी रुपयांचा कर थकीत आहे. महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने यंदा मालमत्ता करांची बिले वाटप महिला बचत गटांतील महिलांना देण्याचे ठरवले होते. याला प्रकल्प सिद्धी असे नाव देण्यात आले. हा निर्णय महिला बचत गटांनी सार्थ ठरविला आहे.

महिलांनी शंभर टक्के बिलाचे वाटप केले. त्यामुळे नागरिकांनी पहिल्या सहामाहीत कर भरण्यास प्राधान्य दिले. मालमत्ता नोंद अभियानाने वेग घेतला आहे. यातही शहरातील महिला बचत गटातील महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला आहे. नागरिकांनी आपल्या मालमत्तांची अचूक नोंद होण्यासाठी या अभियानाला प्रतिसाद द्यावा. :- शेखर सिंह आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Latest News