मान्यवरांच्या प्रभावी अभिवाचनातून ‘उमगले गांधी ‘ !…..महात्मा गांधी सप्ताहानिमित्त आयोजन

IMG-20231007-WA0412

मान्यवरांच्या प्रभावी अभिवाचनातून ‘उमगले गांधी ‘ !…………………महात्मा गांधी सप्ताहानिमित्त आयोजन

पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी च्या राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह निमित्त आयोजित ‘ उमगलेले गांधी ‘ अभिवाचनाने शनिवारी पुणेकरांना गांधींजींच्या विविध पैलूंचे दर्शन घडवले !हा कार्यक्रम गांधी भवन, कोथरूड येथे शनिवारी सायंकाळी झाला.’

उमगलेले गांधी ‘ हा विविध लेखकांनी वेळोवेळी महात्मा गांधींच्या जीवनावर आणि स्वातंत्र्य लढ्यावर लिहिलेल्या लेखांचे अभिवाचन करणारा कार्यक्रम होता. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, सुहिता थत्ते आणि धनश्री करमरकर यांनी अभिवाचन केले.

दिलीप प्रभावळकर यांनी खुद्द महात्मा गांधी यांनी स्वतःच लिहिलेला लेख “भारत दर्शन” चे वाचनाने या अभिवाचन कार्यक्रमाला आरंभ केला. कार्यक्रमाला उत्तरोत्तर उपस्थितांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला. “भारतदर्शन यात्रेत भक्तीच्या नावावर चालू असलेला दांभिकपणा आपल्या नजरेस आला, असे गांधींनी लेखात म्हटले.”

असेप्रभावळकर यांनी सांगितले.रस्ते जसे गलिच्छ तसेच मंदिराचे गाभारेही गलिच्छ होते. धर्मगुरूंनी अध्यात्माच्या नावाखाली येथील भोळ्याभाबड्या जनतेच्या अध्यात्मावर घाला घातला होता.

सत्य बोलणे कठिण झाले होते, लोक निर्भय झाले तरच देशाला स्वातंत्र्य मिळेल, असे गांधींनी आपल्या या भारत दर्शन लेखात म्हटले होते.’अखंड जीवनाचे उपासक ‘ या स.ग. भागवत यांच्या लेखाचं वाचन धनश्री करमरकर यांनी केले, सुहिता थत्ते यांनी ‘ छोडो भारत ‘ या श्रीपाद केळकर यांच्या लेखाचं वाचन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे अरूण काकडे यांनी ‘मूठभर मीठ ‘ या वि. स. वाळिंबे यांच्या लेखाचं वाचन केले. काकडे यांनी सुरेश भट यांची “ते” ही गांधींवरील कविता “त्यावेळी तू आलास,” ही कविता तसेच कुसुमाग्रजांची “माझ्या मागे फक्त सरकारी भिंती” , ‘ही अखेरची कमाई ‘ ही कविता सादर केली

.करमरकर यांनी सुरेश द्वादशीवार यांनी लिहिलेल्या ‘गांधी आणि सशक्त क्रा़ंतीकारक ‘ या लेखाचे वाचन केले. काकडे यांनी “गोळवलकर गुरुजी आणि महात्मा गांधी” हा नरहर कुरुंदकर यांचा लेख वाचला.गोळवलकर गुरुजींनीही महात्मा गांधी यांना राष्ट्रपीता म्हटले होते, याचा उल्लेख केला

.जेथे बोलणे जास्त तेथे काम कमी होते, आणि जीभ आवरली तर जगात शिकण्यासारखे खूप आहे, असं गांधी म्हणाले हेही प्रभावळकर यांनी सांगितलेरामचंद्र गुहा यांचा काश्मीरवरील लेखा चे थत्ते यांनी वाचन केले.आभार प्रदर्शन संदीप बर्वे यांनी केले…