‘गझल के साये मे’ कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद !


…………
पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमा अंतर्गत आयोजित ‘ गझल के सायेमें ‘ या डॉ. सुनिला धनेश्वर यांच्या गझल गायनाच्या सुरेल कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
भारतीय विद्या भवन च्या सरदार नातू सभागृहात शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला.
डॉ.सुनीला धनेश्वर यांच्या सुरेल आलापीने असा काही माहोल निर्माण झाला, तो उत्तरोत्तर रंगतच गेला. ऊर्दूचे अस्खलित शब्दोच्चार, गझल गायनावरचे नितांत प्रेम, रियाज या कार्यक्रमात प्रकट झाला. एकामागून एक लोकप्रिय गझल पेश होत होत्या, त्याला रसिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत गेला. नासिर काज़मी, गालिब, निदा फाजली, शकील बदायुनी, ताहिर फ़राज, अमिर मिनाई, अहमद फराज, साहिर होशियारपुरी, कतिल शिफाई, फैयाज हाशमी या प्रसिद्ध शायरांच्या, नामवंत गायकांनी गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या गझल डॉ.सुनिला धनेश्वर यांनी अतिशय आपल्या शैलीत पेश केल्या . ‘उघड्या पुन्हा जहाल्या ‘ ही उमाकांत काणेकर यांची एक मराठी गझलही त्यांनी प्रभावीपणे सादर केली
या कार्यक्रमात सूत्रसंचालनाची धुरा अनिरुद्ध दडके यांनी सांभाळली. संवादिनीची साथ अनय इनामदार यांनी केली, तबल्याची परिणामकारक संगत अरुण गवई यांची होती तर व्हायोलिनची हळुवार, सुरेल साथ
अनुप कुलथे यांनी केली .भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १८४ वा कार्यक्रम होता. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी कलाकारांचा सत्कार केला.