समृद्धी महामार्ग प्रकरणी दोषींवर कारवाई करा हिंदू महासंघाची पत्रकार परिषदेत मागणी


भ्रष्टाचार आणि चुकीच्या कामामुळे समृद्धी महामार्ग बनला मृत्यूचा सापळा :आनंद दवे यांचा आरोप
पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
भ्रष्टाचार आणि केलेल्या चुकीच्या कामामुळे समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी हिंदू महासंघाने पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
५५ हजार कोटी रुपयांचा खर्च करून तयार केलेला समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा ठरला आहे. रोज होणारे मृत्यू, समृद्धी महामार्गचे काम चुकीच्या हातात गेल्याचा परिणामांवर हिंदू महासंघातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली.यावेळी अध्यक्ष आनंद दवे यांनी महामार्ग प्रशासन,राज्य सरकार यांना अनेक सवाल विचारले.परिषदेला आनंद दवे यांच्या सह मनोज तारे, विवेक परदेशी,सुर्यकांत कुंभार,सौ.विद्या घटवाई,उमेश कुलकर्णी यांच्यासह हिंदू महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना आनंद दवे म्हणाले समृद्धी महामार्ग चे आरेखन हे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळच्या अंतर्गत ई.पी.सी. (EPC – Engineering, Procurement & Construction mode) च्या पद्धतीने केले आहे, जेव्हा एखाद्या मोठ्या प्रोजेक्ट साठी एका कॉन्टॅक्टरला बोलावलं जातं,तेव्हा हे अग्रीमेंट आणि काम EPC पद्धतीने केल जाते.यातील कराराप्रमाणे EPC च्या कॉन्टॅक्टर ला त्या कामासंदर्भातील सर्व कार्य,आरेखन, खरेदी, कामाची गुणवत्ता आणि हस्तानतरण यासाठी जबाबदार धरले जाते.यातील करारानुसार कामातील काही भाग किंवा पुर्ण काम दुसऱ्या कोणा कॉन्टॅक्टरला देण्याची परवानगी सदर कॉन्टॅक्टरला असते.
१६ कंपन्यांपैकी मेघा इन्फ्रास्टक्चर कंपनी बाबत दवे यानी माहिती दिली.या हैद्राबाद च्या कंपनीला नागपूर ते मुंबई या टप्प्यातील ३१ किमी चे शिव मडका ते खडकी आमगाव येथील काम देण्यात आले. सदर काम १५६५ कोटी रुपये चे आहे.याचा प्रत्येक किलोमीटर मागे खर्च 50 कोटी रुपये होतो! हि कंपनीवर काही राज्यात काही काळ बंदी होती. कमी दर्जाचे काम,आणि व्यावसायिक दृष्टिकोनचा अभाव असे ताशेरे त्यावर ओढण्यात आले आहेत. या कंपनी ने कॉंग्रेस ला १०० कोटींची देणगी दिल्याचा आरोप भाजप खासदाराने केला होता.समृद्धी महामार्गाचे काम सुरु झाल्यावर कंपनी ने उभा केलेला एक पूल कोसळून ३६ कोटींचे नुकसान झाले होते.पण कोणावरही कारवाई झाली नाही.
तसेच शासकीय यंत्रणांना सवाल करताना अपघातात मृत्यू झालेला इसम मोहम्मद रा. बिहार याच्या मृत्यू ची एफ आय आर दिनांक 25/4/2022 रोजी हिंगणा येथे करण्यात आली असून सुद्धा आजपर्यंत काहीच कारवाई झाली नाही. या युवकाला न्याय मिळणार का असा सवाल आनंद दवेंनी केला.
पुढे माहिती देताना त्यानी सागितले कि,अखिल भारतीय पत्रकार संघांचे अध्यक्ष शेख अली यांनी MSRDC ला आणि राधेश्याम मोपलवार यांना समृद्धी मार्गाच्या एकूण व्यवहार आणि दर्जा ची चौकशी करण्याची मागणी केली होती. पण आज पर्यंत काही निर्णय झालेला नाही असे का ? समृद्धी महामार्ग हा एकूण ७०१ किलोमीटर चा रस्ता ५५ हजार कोटी खर्च करून तयार होत आहे. सरासरी याचा खर्च प्रति किलोमीटर ७८ कोटी रुपये येत आहे.एकूण १६ कॉन्टॅक्ट यासाठी देण्यात आले असून प्रत्येकाचा दर आणि प्रति किलोमीटर चा वेळ वेगवेगळा आहे.कच्च्या मालाचे दर वाढले तर कॉन्टॅक्ट चे दर वाढवून देण्याची तरतूद यात आहे. पण त्याचे नियंत्रण कोणाकडे ही नाही. जनतेसाठीच्या विकास कामे अशा पद्धतीने सुरू असल्यास याला जबाबदार कोणास धरायचे ?
EPC च्या करार क्रमांक २७ प्रमाणे कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला कंपनी कडून लाच,किंवा अन्य फायदा देण्याचा प्रयत्न झाला तर सदर कंपनी ब्लॅक लिस्ट केली जाते व काम थांबवलं जाते इथे तर भ्रष्टाचाराची परिसिमा गाठल्याचे सांगताना दवे यांनी सांगितले की सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण, त्यांचा खर्च करणं आणि त्यांच्या प्रवासाची जवाबदारी घेणं असे गुन्हा CBI आणि ACB ने या कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात दाखल केले आहेत.असं असून सुद्धा या कंपनी ला काम देण्यात आले. या कंपनी विरोधात करूर वैश्य बँकेने आर्थिक फसवणूक ची तक्रार सुप्रीम कोर्टात दाखल केलेली आहे.न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा आणि अभिनंदन कुमार यांनी कंपनी वर ताशेरे ओढले आहेत . कलिश्वरन इरिगेशन प्रोजेक्ट हा तेलेंगणा येथील या कंपनी ने केलेला प्रोजेक्ट हा भारतातील सर्वात मोठा भ्रष्टाचार झालेला प्रोजेक्ट मानला जातो.एवढा पूर्ण काळा इतिहास असताना सुद्धा याच कंपनीला ठाणे ते बोरिवली च्या बोगदा बनवण्याचे काम देण्यात आले असून 12 किलोमीटर च्या दोन भोगदे साठी तब्बल १४,४०० कोटी रुपयांचे हे टेंडर आहे.
या महामार्ग निर्मिती मधील सर्व १६ कंपन्यांचे हात बरबटले असून लवकरच अन्य कंपन्यांचे इतिहास सुद्धा बाहेर काढून जनतेच्या पैशाचा झालेला भ्रष्टाचार सर्वासमोर आणू,असेही आनंद दवे यांनी सांगितले. अजूननही वेळ गेली नाही. तज्ञांकडून स्ट्रक्चरल पाहणी करून महामार्गाची रचना सुधारावी,सुविधा वाढवाव्यात व मृत्युचे तांडव कसे थांबेल, याकडे प्रशासनाने त्वरीत लक्ष द्यावे अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली.