मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला मराठवाडा जनविकास संघाचा पाठींबा


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला पिंपरी चिंचवडमधील मराठवाडा जनविकास संघाने पाठींबा दर्शवला आहे. नुकत्याच जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये झालेल्या सभेच्या वेळी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार आणि पदाधिकाऱ्यांनी हा पाठींबा जाहीर केला.
यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष व श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त वृक्षमित्र अरुण पवार, सोशल मीडिया अध्यक्ष अमोल लोंढे, सोमनाथ शेटे, मराठवाडा विकास प्रतिष्ठानचे प्रकाश इंगोले, धारूर गावचे लोकनियुक्त सरपंच बालाजी पवार, दिघी विकास मंचचे सुनील काकडे, सोमनाथ कोरे, शंकर तांबे, नवनाथ निंबाळकर, लक्ष्मण कोनाळे, संतोष तांबे, राजेंद्र तांबे, नारायण तांबे, प्रदीप खोले, संतोष जेधे, बाळासाहेब इंगळे, विनोद जाधव, अक्षय लबडे, पांडुरंग उढाण, गणेश उढाण, अविनाश शिंदे, दत्ता शिराळे, निखिल सवळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन तीव्र केले आहे. राज्यभरातील मराठा बांधवांनी या आंदोलनाला पाठींबा दर्शवत मराठा आरक्षणाची मागणी केली आहे. पिंपरी चिंचवडमधूनही आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग दिसत आहे. मराठवाडा जनविकास संघाने पाठींबा दर्शवत मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, ही मागणी लावून धरली आहे.
अरुण पवार यांनी सांगितले, की मराठवाडा जनविकास संघ जरांगे पाटील यांच्यासोबत ठामपणे उभा राहणार आहे. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी, मराठा आरक्षणात बलिदान दिलेल्या 45 बांधवांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी द्यावी, दर दहा वर्षाने आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करुन प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्या, पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त निधी देऊन त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत या सर्व मागण्या रास्त आहेत. त्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात होणाऱ्या इथून पुढच्या सभांना पिंपरी चिंचवड, तसेच धारूरमधील मराठवाडा जनविकास संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचेही अरुण पवार यांनी सांगितले.