खळबळजनक गोष्टी लिहिल्या की ते पुस्तक प्रकाशझोतात येते- उपमुख्यमंत्री अजित पवार


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पुण्यातील येरवाडा उपनगरातील पोलिसांच्या जमिनीचा लिलाव करण्याचा आदेश (Pune) पालकमंत्री अजित पवार यांनी 2010 मध्ये आपल्याला दिला होता. पण, आपण त्याला नकार दिल्याचा आरोप पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकातून केला होता. त्यावरुन राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.विरोधकांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या आरोपांना पवार यांनी आज पत्रकार परिषद घेवून उत्तर दिले आणि चर्चेला पूर्णविराम दिला.येरवाड्यामधील सरकारी भूखंड विकसनासाठी खासगी विकासकाला (बिल्डर) देण्याचा (Pune) निर्णय कोणा अधिका-यामुळे नव्हे तर गृह विभागाने रद्द केला. माझा त्या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही.पुस्तकात काही खळबळजनक गोष्टी लिहिल्या की ते पुस्तक प्रकाशझोतात येते, तसा प्रयत्न यावेळी झालेला दिसून येतो, असा टोमणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांना मारला.येरवाड्यामधील सरकारी भूखंडा प्रकरणी बोरवणकर यांच्याशी चर्चा केली हे मी कबूल करतो, मात्र तो निर्णय घ्यायला मी णताही दबाव टाकला नाही. त्यांनी जागा देण्यास विरोध दर्शवल्यानंतर मी देखील पुन्हा त्यांना त्याविषयी हटकले नाही. एखाद्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करत असताना शहरातील अनेक प्रश्न असतात. संबंधित लोक जेव्हा तुम्हाला पालकमंत्री म्हणून एखादी गोष्ट सांगत असतात, त्यावेळी आढावा घ्यावा लागतो, असेही ते म्हणाले.