ड्रग्ज माफिया ललित पाटीलला चेन्नईतून अटक, मुंबई पोलिसांची कारवाई


ड्रग्ज माफिया ललित पाटीलला चेन्नई तून अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
पुणे :ससून रुग्णालयातून पळून गेलेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला अटक करण्यात आली आहे. २ ऑक्टोबर २०२३ रोजी ललित पाटील ससून रुग्णालयात पळून गेला होता.ससून रुग्णालयातून पळून गेलेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ललित पाटील याला ताब्यात घेतलं आहे. त्याला महाराष्ट्रात आणले जात असून न्यायालयात हजर केले जाणार आहे. २ ऑक्टोबर २०२३ रोजी ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. पुणे पोलिसांची व पथके तसेच मुंबई व नाशिक पोलिस त्याचा शोध घेत होती.
पुणे पोलिसांचे पथक भूषण पाटीलला घेऊन रवाना झाले. दरम्यान या तपासाप्रकरणी पुणे पोलिसांसह नाशिक पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.
मोठे मासे अडकणार?

ललित पाटील याला ससून रुग्णालयात सर्व सुविधा पुरवल्या जात असल्याचं उघड झाल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर आरोपांची राळही उठली होती. राजकीय पक्षांनी या प्रकरणावरून एकमेकांना टार्गेट केलं होतं. ड्रग्स माफिया असलेल्या ललितला कोण सुविधा पुरवत होतं? रुग्णालयातून तो ड्रग्सचं रॅकेट कसं चालवत होता? त्याच्यामागे कुणाकुणाचं पाठबळ होतं? याचा उलगडा आता होणार असल्याचं सांगितलं जात आहे