(ड्रीम-११) ऑनलाइन सट्टा,करोडपती पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे अखेर निलंबीत

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे (ड्रीम-११) ऑनलाइन जुगाराच्या माध्यमातून करोडपती झाले होते. मात्र त्यानंतर पीएसआय झेंडे यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली होती. अखेर पीएसआय झेंडे यांना प्राथमिक चौकशी नंतर निलंबित करण्यात आले असून त्यांची विभागीय चौकशी उपायुक्त बांगर यांचेकडे देण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी दिली आहे

.पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे (ड्रीम-११) ऑनलाइन जुगाराच्या माध्यमातून करोडपती झाले होते.

त्यानंतर भाजपाचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र व्यवहार करत झेंडे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर काही तासातच पिंपरी- चिंचवड पोलिसांनी देखील कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी तपासून पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडे यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले होते.

अखेर चौकशीनंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार पीएसआय सोमनाथ झेंडे यांना प्राथमिक चौकशी नंतर निलंबित करण्यात आले असून त्यांची विभागीय चौकशी उपायुक्त बांगर यांचेकडे देण्यात आली आहे

.पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील मुख्यालय या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना ड्रीम इलेव्हनच्या ऑनलाईन जुगारामध्ये अव्वल क्रमांक आल्याने तब्बल दीड कोटींची बक्षीस मिळाले होते. यामुळे झेंडे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र हा आनंद फार काळ काही टिकला नाही. काही दिवसातच पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून त्यांची प्राथमिक चौकशी झाली असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Latest News