ऊर्जा खात्यातील कंत्राटी पद्धत बंद करावी :महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ


त्यांच्या ऊर्जा खात्यातील कंत्राटी पद्धत बंद करावी* पुणे (ऑनलाईन परिवर्तनाच सामाना )
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी कंत्राटी पद्धतीचा अध्यादेश रद्द केल्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले मात्र त्यांनी तात्काळ . परंतु आता त्यांच्या ऊर्जा खात्यातील कंत्राटी कामगार पद्धत कायमस्वरूपी बंद करून त्याच्या खात्यातील वीज कामगारांना कंत्राटदार विरहित रोजगार द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहें
.प्रशासकीय अधिकारी आर्थिक हित संबंधातून कंत्राटदारांना पाठीशी घालतात व यातून कामगारांवर अन्याय होतो याची माहिती ऊर्जामंत्री फडणवीस यांना असून त्यांनीच मिटिंग घेऊन प्रलंबित धोरणात्मक विषयावर निर्णय घेऊन त्याच्या खात्यातील कामगारांनां न्याय द्यावा या साठी संघटना आग्रही आहे.
1 नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर मोर्चा च्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी मंत्रालयात प्रधान सचिव ऊर्जा यांच्या अध्यक्षते खाली महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती.या चर्चेत वीज कंत्राटी कामगारांना वर्षानुवर्षे भेडसावत असलेल्या विविध आर्थिक व सामाजिक समस्यां बाबत, शासकीय संविधानिक देय रकमेचा गैरवापर करणाऱ्या भ्रष्ट कंत्राटदारांवर कारवाई करावी,
,अन्यायग्रस्त कामगारांच्या समस्यां सोडवण्यासाठी संघटनेने सुचवलेल्या उपाय योजना बाबत सुद्धा कोणताही ठोस वा सकारात्मक निर्णय या मिटिंग मध्ये न घेता आंदोलन मागे घेण्याची विनंती मा.प्रधान सचिव ऊर्जा यांनी केल्याने 1 नोव्हेंबर 23 रोजी मंत्रालयावर मोर्चा काढणारच असा संघटनेचा निर्णय झाला आहे.
कामगारांच्या प्रश्नावर दोषी कंत्राटदार, प्रशासन यावर कारवाई करून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी बुधवारी 25 ऑक्टोबर रोजी प्रत्येक जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर संघटनेच्या द्वार सभा होणार आहेत या,आंदोलनात सर्व जिल्हा तील कामगारांनी एकजुटीने सहभागी व्हावे असें आवाहन महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे( संलग्न भारतीय मजदूर संघ) अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे.
दि 20 आक्टोबर 2023 रोजी झालेल्या बैठकीत प्रधान सचिव ऊर्जा मा.आभा शुक्ला तिन्ही कंपनीचे संचालक मानव संसाधन धनंजय सावळकर ( निर्मिती ) सुगत गमरे ( पारेषण ) अरविंद भादीकर ( वितरण ) व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी उपस्थित होते