नाना फडणवीस यांच्या विषयी अप्रकाशित लेखन पुढे यावे: मंदार लवाटे..


‘ नाना फडणवीस वाडा ‘ माहितीपट रसिकांच्या भेटीस !…नाना फडणवीस यांच्या विषयी अप्रकाशित लेखन पुढे यावे: मंदार लवाटे..मराठी सत्तेचा वचक नानांच्या मुत्सदीमुळे: मंदार लवाटे
पुणे:मेणवलीच्या नाना फडणवीस वाड्याचा इतिहास ‘ नाना फडणवीस वाडा ‘ या डॉक्युड्रामा (माहितीपट )द्वारे रोजी रसिकांच्या भेटीस आला असून अशोक फडणीस, अनघा फडणीस प्रॉडक्शन निर्मित हा डॉक्युड्रामा दि.२२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय सभागृह, लॉ कॉलेज रोड येथे प्रदर्शित करण्यात आला .याचवेळी ‘ नाना फडणवीस ‘ या यू ट्यूब चॅनल चे उद्घाटन झाले.
इतिहास अभ्यासक मंदार लवटे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.डॉ.बाळकृष्ण दामले हे या माहितीपटाचे कार्यकारी निर्माते असून राजू भोसले, शिवराज माने यांचे दिग्दर्शन आहे.अशोक फडणीस, अनघा फडणीस हे नाना फडणवीस यांच्या पाचव्या पिढीचे प्रतिनिधी असुन त्यांनी या माहितीपट साठी पुढाकार घेतला आहे.
मोहिनी दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.मंदार लवाटे म्हणाले,’ इतिहासातील महत्वाचे संदर्भ प्रकाशात आणण्यासाठी अशा माहितीपटाची गरज आहे.मेणवलीच्या दफ्तरात अनेक नोंदी अजूनही उपलब्ध असून मेणवलीचे दफ्तर अभ्यासण्याची गरज आहे.
इतिहास संशोधक वि. का. राजवाडे आदींनी अभ्यास केला तरीही अजून बराच अभ्यास, संशोधन पुढे होणे आवश्यक आहे.पेशवाईचा हिशेब, राजकीय, लष्करी व्यवस्था नाना फडणवीस पाहात होते. मुत्सद्दी म्हणून ते प्रसिद्ध होते.नानांच्या फडात १५०० कारकून होते.
मराठी सत्तेचा वचक नाना फडणवीस यांच्या मुळे टिकून राहिला. त्यांच्या विषयी अप्रकाशित साहित्य पुढे आले पाहिजे. त्यांच्या विषयी लेखन हिंदीत आले पाहिजे. काटेकोर पणा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. हा देश अखंड राहिला, यात त्यांच्यासारख्या मराठी लोकांचे शौर्य कारणीभूत आहे.डॉ.बाळकृष्ण दामले म्हणाले, ‘नानांच्या कार्यातील भव्यता माहितीपटात आणण्याचा प्रयत्न केला आहे.
जागतिक स्तराला माहितीपटाला संदर्भमूल्य असल्याने हे माध्यम निवडले आणि त्यातून सत्यता मांडली आहे .विकासाच्या वेगात जुने संचित नष्ट होते आहे. त्यामुळे दस्तावेजीकरणाचे असे प्रकल्प होत राहिले पाहिजेत’.दिग्दर्शक राजू भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले.पुष्कर पेशवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते
. नाना फडणवीस यांच्या वरील यू ट्यूब चॅनल चे उद्घाटन करताना मंदार लवाटे. डावीकडून अनघा फडणीस, अशोक फडणीस, मंदार लवाटे, डॉ बाळकृष्ण दामले आणि राजू भोसले …